Swatantra Veer Savarkar Movie: रणदीप हुड्डा आणि अंकिता लोखंडेच्या 'स्वातंत्रवीर सावरकर'चा Trailer रिलीज

Swatantra Veer Savarkar Movie Trailer Out: रणदीप हुड्डाच्या या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षक वाट पाहते होते. अखेर आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर पाहून प्रेक्षकांच्या मनामध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे.
Randeep Hooda and Ankita Lokhande Starrer Swatantra Veer Savarkar Movie Trailer Out
Randeep Hooda and Ankita Lokhande Starrer Swatantra Veer Savarkar Movie Trailer OutSaam Tv

Swatantrya Veer Savarkar Movie Trailer:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणदीप हुड्डाच्या (Randeep Hooda) दिग्दर्शनाखाली तयार होत असलेला 'स्वातंत्रवीर सावरकर' हा चित्रपटाची (swatantrya veer savarkar) गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा होत आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या चित्रपटामध्ये रणदीप हुड्डाने अभिनयासोबत दिग्दर्शनाची जबाबदारी देखील स्वीकारली आहे. रणदीप हुड्डाच्या या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षक वाट पाहते होते. अखेर आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर पाहून प्रेक्षकांच्या मनामध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे.

'स्वातंत्रवीर सावरकर' या चित्रपटामध्ये रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेमध्ये आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडे देखील या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अंकिता लोखंडे बऱ्याच वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. हा चित्रपट २२ मार्चला प्रदर्शित होणार आहे. अशामध्ये या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला. नुकताच हा ट्रेलर लाँच इव्हेंट पार पडला. पण या इव्हेंटला अंकिता लोखंडे हजर राहू शकली नाही. पण तिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे.

हा ट्रेलर प्रेक्षकांना राजकारणी आणि कार्यकर्ते विनायक दामोदर सावरकर यांचा जीवन प्रवास आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष दाखवणार आहे. ट्रेलरमध्ये रणदीप हुड्डा आपल्या उत्कृष्ट अभिनयाने लक्ष वेधून घेतो. तर अंकिता लोखंडेने त्याच्या पत्नीची भूमिका साकारणार असल्याचे दिसत आहे. प्रेक्षकांना चकित करणारी अंकिताची भूमिका नक्कीच लक्षवेधी ठरणार आहे.

अंकिता आणि रणदीपच्या पात्रांमध्ये उत्सुकता वाढवणारी गोष्ट म्हणजे ते दोघे मूळ व्यक्तिमत्त्वांसारखेच दिसतात. ज्यामुळे ते या चित्रपटात काहीतरी नक्कीच वेगळ्या भूमिकेत दिसणार यात शंका नाही. 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या व्यक्तिरेखेतील रणदीपचा दृढ विश्वास आणि अंकिताने त्यांची पत्नी 'यमुनाबाई'ची साकारलेली भूमिका उल्लेखनीय ठरणार आहे. 'स्वातंत्र्य वीर सावरकर' हा चित्रपट रणदीप हुड्डाने दिग्दर्शित केला आहे. स्वातंत्र्य वीर सावरकर 22 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या मनावर जबरदस्त प्रभाव टाकण्यासाठी सज्ज झाला आहे.

Randeep Hooda and Ankita Lokhande Starrer Swatantra Veer Savarkar Movie Trailer Out
Anant- Radhika Pre-Wedding: 'आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे…' गाण्यावर अनंत-राधिकाचा रोमँटिक डान्स, VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com