Suresh Wadkar: गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जेष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर

Suresh Wadkar: यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२३ हा ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर झाला आहे
Suresh Wadkar:
Suresh Wadkar: Facebook
Published On

Gansamradni Lata mangeshkar puraskar 2023:

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२३ हा ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज घोषणा केली. (Latest Marathi News)

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारांच्या रकमेत पुरस्काराच्या रकमेत दुप्पट वाढ करण्यात आली आहे. राज्य सांस्कृतिक पुरस्काराची रक्कम तिप्पट करण्यात आली आहे. या पुरस्कारांची घोषणा केल्यानंतर मंत्री सुधीर मुनगंटीवार पहिली प्रतिक्रिया दिली. 'राज्याचे सांस्कृतिक क्षेत्र संपन्न व्हावे , तसेच यासाठी तत्पर आहे, असे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

Suresh Wadkar:
Naal 2: निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना चिमी कशी सापडली, सुधाकर रेड्डींनी सांगितला किस्सा

यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकरांना जाहीर झालेला आहे. संगीत आणि गायन क्षेत्रात सातत्यपूर्ण आणि अमूल्य योगदान दिल्याने सुरेश वाडकरांना यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार २०२२ हा पंडित उल्हास कशाळकर यांचे नाव घोषित झाले आहे. तर २०२३ च्या पुरस्कारासाठी पं. शशिकांत (नाना) श्रीधर मुळ्ये यांची घोषणा करण्यात आली आहे.

Suresh Wadkar:
Hemangi Kavi Post: ‘कंदील निवडणं काय सोप्पं काम नसतं गड्या’; दिवाळीनिमित्त हेमांगी कवीने शेअर केली खास आठवण

नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार २०२२ यासाठी सुहासिनी देशपांडे यांच्या नावाची घोषणा झाली आहे. तर २०२३ साठी अशोकजी समेळ यांना पुरस्कार घोषित झाला आहे.

संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव २०२२ चा पुरस्कार नयना आपटे यांना जाहीर झाला आहे. तर २०२३ च्या पुरस्कारासाठी पंडित मकरंद कुंडले यांची निवड झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com