Hanuman Makers Donate 14 Lakhs To Ram Mandir Trust Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hanuman Makers Donate 14 Lakhs: 'हनुमान'च्या निर्मात्यांनी राम मंदिर ट्रस्टला दिली १४ लाखांची देणगी

Chetan Bodke

Hanuman Makers Donate 14 Lakhs Ram Mandir Trust

तेजा सज्जा स्टारर 'हनुमान' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहे. चित्रपटाने तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर ४० कोटींच्या आसपास कमाई केली आहे. दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्मात्यांकडून राम मंदिर ट्रस्टला १४ लाख रुपये दान केले आहेत.

'हनुमान' चित्रपटाच्या विकल्या जाणाऱ्या प्रत्येक तिकिटामागे ५ रुपये अयोध्या राम मंदिराच्या उभारणीसाठी दान केले जाणार असल्याची माहिती यापूर्वी निर्मात्यांनी दिली होती. नुकताच दिग्दर्शकांनी इंडिया टुडेला मुलाखत दिली होती, "चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईतून १४ लाख रुपये राम मंदिर ट्रस्टला दान करण्यात आले आहे. चित्रपटाच्या कमाईचा विचार न करता, निर्मात्यांनी हा निर्णय आधीच घेतला होता. प्रशांत वर्मा यांनी पहिल्या दिवसाच्याच कमाईमधून राम मंदिर ट्रस्टला १४ लाख रुपयांची देणगी दान दिली आहे." या निर्णयामुळे 'हनुमान' चित्रपटाच्या टीमचे सर्वत्र जोरदार कौतुक केले जात आहे. (Tollywood)

प्रशांत वर्मा पुढे म्हणाले, "ज्यावेळी निर्मात्यांनी राम मंदिर बांधण्याबद्दल ऐकले त्यावेळी चित्रपट हिट होईल की फ्लॉप या गोष्टीचा विचार न करता विकल्या जाणाऱ्या प्रत्येक तिकीटातून ५ रुपये अयोध्या राम मंदिराच्या उभारणीसाठी दान केला जाणार असल्याचा निर्णय घेतला होता. पण आता चित्रपटाने चांगली कमाई केल्याबद्दल पहिल्या दिवसाच्या कमाईतून मंदिराला सुमारे 14 लाख रुपये दान केले आहे. चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद पाहून आता आम्ही लवकरच चित्रपटाच्या सीक्वेलचं काम करतो."

चित्रपटाबद्दल सांगायचे तर, प्रशांत वर्मा दिग्दर्शित 'हनुमान' चित्रपट १२ जानेवारीला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. हा चित्रपट अवघ्या २० कोटींमध्ये निर्मित झाला असून, चित्रपटाने फक्त तीन दिवसात ४०. १५ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत तेजा सज्जा सह अमृता अय्यर, वरलक्ष्मी शरतकुमार, विनय राय, राज दीपक शेट्टी, वेन्नेला किशोर अशी स्टारकास्ट आहे. तर चित्रपटाची निर्मिती एस. निरंजन रेड्डी आणि के निरंजन रेड्डी आहे. (Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bombay Vada pav : तुम्ही मुंबईत राहत असाल तर वडा पाव हा तुमच्या सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय असेल.

PM Modi : पंतप्रधान मोदींची विरोधकांवर कठोर शब्दांत टीका; पाहा Video

Marathi News Live Updates : सांगलीमध्ये ४० ते ५० जणांना भगरीच्या तांदळातून विषबाधा

Rekha: मी प्रेमाला नाही तर 'बिग बी'ला घाबरते, अभिनेत्री रेखाचा मोठा खुलासा; पाहा VIDEO

Irani Cup 2024: मुंबई'अजिंक्य'! २७ वर्षांची प्रतिक्षा संपवत कोरलं इराणी ट्रॉफीवर नाव

SCROLL FOR NEXT