konkan Tourism : शिमग्याला कोकणात गेलाय ना; मग 'ही' खास ठिकाणं तुमची वाट पाहत आहेत, पाऊल ठेवताच हिरव्यागार निसर्गात हरवून जाल

Famous Tourist Spot In konkan : शिमग्याला सुट्टी काढून गावी गेला असाल तर छान कोकणची सफर करा. वन डे पिकनिकसाठी बेस्ट लोकेशन्स आताच नोट करा.
Famous Tourist Spot In konkan
konkan Tourismsaam tv
Published On
Summary

कोकणचे सौंदर्य जगात भारी आहे.

शिमग्याला कोकणात गर्दी पाहायला मिळते.

कोकणात हिरव्यागार निसर्गात सुंदर पर्यटन स्थळे आहेत.

आज (3 मार्च 2026) सर्वत्र होळी या सणाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. शिमगा म्हटले की, आपोआप पावले कोकणाकडे वळतात. कोकणात शिमग्याचा मोठा उत्सव पाहायला मिळतो. धुळवडीला सर्वजण एकमेकांना रंगांनी रंगवून टाकतात. हा आनंदाचा, सकारात्मकतेचा आणि रंगांचा सण आहे. तुम्ही जर यंदा शिमग्याला कोकणात गेला असाल तर आवर्जून कोकणातील ही निसर्गरम्य ठिकाणे पाहा. कुटुंबासोबत छोटी ट्रिप करा.

गणपतीपुळे

'गणपतीपुळे' हे कोकणचे आकर्षण आहे. येथे समुद्रकिनारी स्वयंभू गणपती मंदिर वसलेले आहे. येथे गणपतीपुळे बीचवर तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता. तसेच प्री-वेडिंग शूटसाठी देखील हे उत्तम लोकेशन आहे.

तारकर्ली

तारकर्ली किनारा निळ्याशार पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे पर्यटक स्कुबा डायव्हिंगचा आनंद घेतात. तारकर्ली बीचजवळ सिंधुदुर्ग किल्ला, देवबाग संगम पाहायला मिळते. तारकर्लीला गेल्यावर साहसी जलक्रीडांचा भन्नाट अनुभव घेता येतो.

रत्नागिरी

रत्नागिरी हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे गेल्यावर थिबा पॅलेस, मांडवी बीच ही पर्यटन स्थळे नक्की पाहा. तुम्ही येथे वन डे पिकनिक प्लान करू शकता. येथे तुम्हाला स्वच्छ समुद्रकिनारे पाहायला मिळतील.

मालवण

मालवण आपल्या मालवणी खाद्यसंस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. येथे जगप्रसिद्ध सिंधुदुर्ग किल्ला आहे. तसेच जवळच चिवला बीच देखील आहे. येथील सोलकढी प्यायला परदेशी पर्यटक गर्दी करतात.

दापोली

दापोली ही थंड हवेचे ठिकाण आहे. येथे सर्वत्र हिरवीगार वनराई पाहायला मिळते. येथे गेल्यावर हर्णे बंदर, मुरुड-दापोली बीच, कर्दे बीच आहे. कमी गर्दीचे भन्नाट लोकेशन आहे.

वेंगुर्ला

सागरेश्वर बीच, वेताळ टेकडी, रेडी गणपती मंदिर ही वेंगुर्ला येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. येथे सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.

Famous Tourist Spot In konkan
Holika Dahan 2026: होळी दहनाच्या अग्नीत या वस्तू टाकणं अशुभ! जाणून घ्या योग्य नियम

श्रीवर्धन

श्रीवर्धन ही कोकणाची शान आहे. श्रीवर्धन बीच, हरिहरेश्वर ही ठिकाणे जवळ आहे. श्रीवर्धन ऐतिहासिक, धार्मिक पर्यटन स्थळ आहे. फॅमिली पिकनिकसाठी एकदम बेस्ट ठरेल.

हरिहरेश्वर

हरिहरेश्वरला 'दक्षिण काशी' म्हणून ओळखले जाते. येथे हरिहरेश्वर मंदिर, हरिहरेश्वर समुद्रकिनारा आहे. येथे सुंदर समुद्रकिनाऱ्याचा संगम पाहायला मिळतो. आध्यात्मिक शांतीसाठी लोक येथे जातात.

आंबोली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे महाराष्ट्रातील एक प्रमुख थंड हवेचे ठिकाण आणि पावसाळी पर्यटन स्थळ आहे. आंबोलीला 'महाराष्ट्राचे चेरापुंजी' म्हटले जाते. दाट धुके, मुसळधार पाऊस, हिरवीगार वनराई, विविध धबधबे येथे पाहायला मिळतात.

दिवेआगर

रायगड जिल्ह्यातील दिवेआगर हे स्वच्छ पांढरी वाळू, नारळ-सुपारीच्या बागा आणि निळ्याशार अरबी समुद्रासाठी प्रसिद्ध असलेले कोकणातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. येथे जलक्रीडांचा आनंद घेता येतो.

Famous Tourist Spot In konkan
Holi Vastu Tips: होळीचा सण साजरा करण्यापूर्वी घरातून या गोष्टी काढा बाहेर; वास्तू दोषाचा सामना करावा लागतो

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com