Holika Dahan 2026: होळी दहनाच्या अग्नीत या वस्तू टाकणं अशुभ! जाणून घ्या योग्य नियम

Holika Dahan 2026 Niyam: होलिका दहनाच्या दिवशी कोणत्या वस्तू अग्नीत टाकू नयेत आणि कोणत्या वस्तू अर्पण करणं शुभ मानलं जातं. याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. नकारात्मकता दूर करण्यासाठी योग्य विधी आणि परंपरा समजून घ्या.
Holika Dahan 2026 Niyam
Holika Dahan 2026 Niyamsaam tv
Published On

दरवर्षी होळीचा सण मोठ्या थाटामाटात आणि आनंदाने साजरा केला जातो. परंतु त्यापूर्वी, फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहन साजरा करण्याची परंपरा आहे. यावेली वाईटावर चांगल्याचा विजय होतो, असं म्हणतात. होलिका दहनाच्या दिवशी, घराच्या अंगणात किंवा कोणत्याही मोकळ्या जागेत होळीचं दहन केलं जातं आणि पूजा केल्यानंतर काही नियमांचे पालन केलं जातं.

घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी होळीच्या अग्नीत काय टाकावं याबद्दल प्रत्येकाचं वेगळं मत असतं. तरी होळीमध्ये कोणत्या गोष्टी टाकू नयेत हे फार कमी लोकांना माहिती आहे. होळीमध्ये कोणत्या गोष्टी टाकण्यास मनाई आहे ते पाहूयात.

Holika Dahan 2026 Niyam
Home Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार बाथरुममध्ये मीठ ठेवल्याने 'हे' दोष दूर होतात, वाचा फायदे आणि उपाय

या वर्षी ३ मार्च २०२५ रोजी, फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी होळी साजरी केली जाते. तर ४ मार्च रोजी रंगांची होळी खेळली जाते. होलिका दहनाच्या दिवशी पूजा करून काही पवित्र वस्तू होळीत टाकण्याची प्रथा आहे. दरम्यान काही वस्तू होळीमध्ये टाकू नयेत, कारण यामुळे घरात नकारात्मकता येऊ शकते.

Holika Dahan 2026 Niyam
Home Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घरात 'हे' एक रोप लावा, पडेल पैशाचा पाऊस

होळीमध्ये कोणत्या गोष्टी टाकू नयेत

शहाळं, सुकलेली फुले, अर्धा तांदूळ, सुकी फळे, तुळशीची पानं, पिंपळाची पानं होळीमध्ये टाकू नयेत. तसंच वड, आंबा आणि शमी यासारख्या झाडाचं लाकूड, चामड्याच्या वस्तू, प्लास्टिकच्या वस्तू, तुटलेल्या वस्तू, खराब झालेल्या वस्तू, जुने झाडू, घाणेरडे कपडे, काचेच्या वस्तू, चोरीच्या वस्तू होळीत अर्पण करू नयेत.

Holika Dahan 2026 Niyam
Home Vastu: घरात देवघर करताना 'या' चुका टाळा, अन्यथा घरात येऊ शकेल संकट

या गोष्टी होळीच्या दहनात टाकू शकता

देवाचं ध्यान करा आणि नंतर होळी दहनाना नमस्कार करा. यानंतर, सर्व वस्तू एक-एक करून अग्नीत टाका. तूप, फुलं, शेणाच्या गोळ्या, सुका नारळ, लवंग, गव्हाच्या शेंगा, नवीन पिकाच्या शेंगा, हरभरा शेंगा, गुलाल, मिठाई, काळे तीळ ते पिवळ्या मोहरी, कापूर, हंगामी फळे, हळदीचा गोळा, गंगाजलाचे काही थेंब, रोली, कच्चा धागा, बार्ली आणि अक्षता. या गोष्टी होळीमध्ये टाकण्यास शुभ मानल्या जातात.

Holika Dahan 2026 Niyam
Vastu Tips: घरातील या दिशेला कचराकुंडी ठेवणं मानलं जातं अशुभ; देवी लक्ष्मी होऊ शकते नाराज

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com