Holi Vastu Tips: होळीचा सण साजरा करण्यापूर्वी घरातून या गोष्टी काढा बाहेर; वास्तू दोषाचा सामना करावा लागतो

vastu tips to follow before Holi festival: होळीपूर्वी घरातील तुटलेल्या काचा, बंद घड्याळ आणि जुने बूट यांसारख्या वस्तू काढून टाकल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते, असं वास्तुशास्त्र सांगतं.
vastu tips to follow before Holi festival
vastu tips to follow before Holi festivalsaam tv
Published On

होळीचा सण आनंद, रंग आणि नव्या गोष्टींच्या सुरुवातीचं प्रतीक आहे. पण तुम्हाला माहितीये का की, घरात ठेवलेल्या काही जुन्या आणि निरुपयोगी वस्तू तुमच्या आयुष्यातील प्रगतीत अडथळा आणू शकतात? वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार, होळीपूर्वी घर स्वच्छ करणं हा केवळ स्वच्छतेचा एक भाग नाही तर घरातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्याचा एक मार्ग देखील आहे.

आपल्या घरात अशा काही गोष्टी असतात ज्यामुळे घरात नकारात्मकता येते. या गोष्टी घरातून तुम्ही लगेच काढून टाकल्या पाहिजेत. या गोष्टी कोणत्या आहेत ते पाहूयात.

फुटलेली काच आणि भांडी

वास्तुशास्त्रानुसार, घरात तुटलेली काच, फुटलेले आरसे किंवा तुटलेली भांडी ठेवणं खूप अशुभ मानलं जातं. अशा वस्तूंमुळे घरात मानसिक ताण आणि आर्थिक अडचणी येतात. होळीच्या स्वच्छतेदरम्यान या गोष्टी सर्वात आधी काढून टाकाव्यात.

vastu tips to follow before Holi festival
Vastu Tips : श्रीमंतांच्या घरी 'या' वस्तूंनी होते भरभराट; जाणून घ्या काय सांगते वास्तुशास्त्र

बंद पडलेलं घड्याळ

वास्तुशास्त्रानुसार , तुमच्या घरात बंद घड्याळ असेल तर ते तुमच्या प्रगतीत अडथळा आणू शकतं. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात आळस येऊ शकतो. जर तुमच्या घरात असं घड्याळ असेल आणि ते दुरुस्त करता येत नसेल तर ते ताबडतोब बाहेर फेकून द्या.

फाटलेले शूज

आपण अनेकदा जुने किंवा फाटलेले शूज स्टोअररूममध्ये किंवा बेडखाली ठेवतो. शास्त्रांनुसार , फाटलेले बूट आणि चप्पल शनिदोष आणि दारिद्र्य निर्माण करतात. होळीच्या शुभ प्रसंगी, सकारात्मक उर्जेचे स्वागत करण्यासाठी जुने, घाणेरडे आणि फाटलेले कपडे दान करावेत.

vastu tips to follow before Holi festival
Positive Lifestyle: तुम्हालाही हवा आहे पॉझिटिव्ह दिवस? मग 'या' गोष्टी आजपासूनच सुरू करा

तुटलेल्या मूर्ती आणि खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक्सच्या गोष्टी

घरातील देव्हाऱ्यात कधीही तुटलेल्या मूर्ती ठेवू नयेत. त्याचप्रमाणे खराब झालेले इलेक्ट्रॉनिक्स वस्तू देखील राहू-केतूचे दोष वाढवतात. वास्तुशास्त्रानुसार, खराब झालेले इलेक्ट्रॉनिक्स असल्याने घरात भांडणं होतात.

vastu tips to follow before Holi festival
Vastu Tips: घरातील या दिशेला कचराकुंडी ठेवणं मानलं जातं अशुभ; देवी लक्ष्मी होऊ शकते नाराज

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती वास्तू शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com