Iran first use of Fattah-2 hypersonic missile : इराणकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. इराणने इस्रायलवर महाविनाशक प्रहार केला आहे. इराणने पहिल्यांदाच 'फतेह-२' हायपरसोनिक क्षेपणास्त्राचा वापर केला आहे. त्यामुळे मध्यपूर्वेतील युद्ध आता अत्यंत विनाशकारी आणि अत्याधुनिक वळणावर येऊन पोहोचले आहे. इराणने पहिल्यांदाच आपल्या 'फतेह-२' (Fatteh-2) या हायपरसोनिक क्षेपणास्त्राचा वापर करून अमेरिका आणि इस्रायलच्या तळांना लक्ष्य केले आहे.
'फतेह-२' (Fatteh-2) हे हायपरसोनिक क्षेपणास्त्र ध्वनीच्या वेगापेक्षा १५ पट अधिक वेगाने धावते. आपल्या तुफानी वेगामुळे या क्षेपणास्त्राने शत्रूच्या रडार यंत्रणांना सहजरीत्या चकवा दिला आहे. या महाविनाशक अस्त्राच्या वापरामुळे इस्रायलची आजवर 'अजेय' समजली जाणारी संरक्षण भिंत (Iron Dome/Defense System) आता धोक्यात आली आहे. इराणच्या या पावलामुळे युद्ध आता तांत्रिकदृष्ट्या अधिक धोकादायक पातळीवर पोहोचले असून, संपूर्ण जगाचे लक्ष या घडामोडींकडे लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.