PM Modi Special Fast : राम मंदिर लोकार्पणाआधी PM मोदींचा ११ दिवस विशेष उपवास, देशवासियांसमोर ऑडिओ क्लिपद्वारे मांडल्या भावना

PM Narendra Modi Audio Clip : या ऐतिहासिक क्षणाला आता यात फक्त 11 दिवस उरले आहेत. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे.
PM Modi
PM Modi Saam TV
Published On

PM Modi News :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१२ जानेवारी) राम मंदिराच्या लोकापर्णाआधी एक ऑडिओ मेसेज जारी केला आहे. यामध्ये त्यांनी 11 दिवसांचा विशेष उपवास सुरू करत असल्याचे सांगितले आहे.

राम मंदिराच्या उद्घाटनच्या या शुभ सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराचं लोकार्पण 22 जानेवारीला होणार आहे. या ऐतिहासिक क्षणाला आता यात फक्त 11 दिवस उरले आहेत. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

PM Modi
Ram Mandir News : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला चारही शंकराचार्य उपस्थित राहणार नाहीत, काय आहे कारण?

पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, 'अयोध्येतील रामलल्लाच्या अभिषेकसाठी केवळ 11 दिवस उरले आहेत. या शुभ सोहळ्याचा मी देखील साक्षीदार होणार आहे, हे माझे भाग्य आहे. परमेश्वराने प्राणप्रतिष्ठेदरम्यान भारतातील सर्व लोकांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे मी आजपासून 11 दिवसांचा विशेष उपवास सुरू करत आहे. माझ्या भावना शब्दात मांडणे खूप अवघड आहे.

PM Modi
Ram Mandir News: राजा विक्रमादित्याने त्रेतायुगात कशी शोधली अयोध्या? वाचा सविस्तर

माझ्यासाठी हा अकल्पनीय अनुभव आहे. मी भावनिक झालो आहे. माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच अशा भावनेतून जात आहे. मी एका वेगळ्या प्रकारची भक्ती अनुभवत आहे. जे स्वप्न अनेक पिढ्यांनी त्यांच्या हृदयात जपलं, त्यांच्या पूर्ततेच्या वेळी उपस्थित राहण्याचे सौभाग्य मला मिळाले आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.

पंतप्रधान मोदींनी पुढे म्हटलं की, आपल्या धर्मग्रंथात सांगितले आहे की भगवंताची उपासना करायची असेल तर आपल्यातील ईश्वरी चैतन्य जागृत करावे लागेल. यासाठी शास्त्रात उपवास आणि कडक नियम सांगितले आहेत. त्यानुसार मी आजपासून ११ दिवसांचा विशेष विधी सुरू करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com