Merry Christmas 3rd Day Collection: कतरिना- विजयच्या 'मेरी क्रिसमस'ला चाहत्यांकडून अफलातून प्रतिसाद, तीन दिवसांमध्ये जमावला इतक्या कोटींचा गल्ला

Merry Christmas Box Office Collection: चित्रपटाचा पहिल्या तीन दिवसामध्ये आलेख चढता असून तीन दिवसामध्ये चित्रपटाने १० कोटींच्या जवळपास कमाई केली आहे..
Merry Christmas 3rd Day Box Office Collection
Merry Christmas 3rd Day Box Office CollectionSaam Tv

Merry Christmas 3rd Day Box Office Collection

श्रीराम राघवन दिग्दर्शित 'मेरी क्रिसमस' चित्रपट १२ डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत असून कतरिनाच्या आणि विजयच्या अभिनयाची पुन्हा एकदा चर्चा होताना दिसत आहे. चित्रपटाचा पहिल्या तीन दिवसामध्ये आलेख चढता असून तीन दिवसामध्ये चित्रपटाने १० कोटींच्या जवळपास कमाई केली आहे.. (Bollywood News)

Merry Christmas 3rd Day Box Office Collection
Munawwar Rana: शब्दांचा जादूगार हरपला! प्रसिद्ध उर्दू कवी मुनव्वर राणा यांचं निधन, वयाच्या ७१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सॅकल्निकच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी २.५५ कोटींची, दुसऱ्या दिवशी ३. ५० कोटींची कमाई तर तिसऱ्या दिवशी चित्रपटाने ३. ७५ कोटींची कमाई केली आहे. अशाप्रकारे, चित्रपटाने तीन दिवसांमध्ये एकूण ९. ६५ कोटींची कमाई केली आहे.

संथगतीने या चित्रपटाने जरीही कमाई सुरु केली असली तरी, या चित्रपटाची चाहत्यांमध्ये बरीच चर्चा पाहायला मिळत आहे. कतरिना कैफ आणि विजय सेतुपतीच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते.

फक्त चाहत्यांकडूनच नाही तर अनेक सेलिब्रिटींकडून आणि बऱ्याच चित्रपट समीक्षकांकडून या चित्रपटाचं कौतुक केलं जात आहे. (Bollywood Film)

Merry Christmas 3rd Day Box Office Collection
Shruti Haasan Trolled: धर्मेंद्र यांना पाहून श्रुती आणि अक्षरा हासन लागल्या हासू, VIDEO पाहून नेटिझन्सनी केलं ट्रोल

'मेरी ख्रिसमस' चित्रपटामध्ये कतरिना कैफ आणि विजय सेथुपती यांच्यासोबतच राधिका आपटे, आदिती गावेकर, टिनू आनंद, संजय कपूर आणि विनय पाठक हे कलाकारही मुख्य भूमिकेत होते. चित्रपटात राधिकाचा कॅमिओ पाहायला मिळणार आहे. 'मेरी ख्रिसमस'या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना कतरिना- विजयची जोडी पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. (Entertainment News)

Merry Christmas 3rd Day Box Office Collection
Isha Malviya च्या वडिलांनी तिचा एक्स बॉयफ्रेंड Abhishek Kumar ला केला सपोर्ट, म्हणाले - 'तू जे केलंय...'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com