बॉलिवूडची कॅट म्हणून चर्चेत राहणारी कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि टॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विजय सेतुपती (Vijay Sethupathi) यांचा 'मेरी ख्रिसमस' (Merry Christmas) चित्रपट आज (१२ जानेवारी) देशभरात रिलीज झाला आहे. सध्या या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा पाहायला मिळतेय.
सध्या नेटकऱ्यांकडून विजय सेतुपथी आणि कतरिना कैफच्या अभिनयाचे जोरदार कौतुक केले जात आहे. सोशल मीडियावर अनेक चित्रपट समीक्षकांकडून, सोशल मीडिया एन्फ्लूएंसरकडून चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर केला जात आहे.
चला तर जाणून घेऊया त्यांना चित्रपट कसा वाटला?, कतरिना आणि विजयच्या अभिनयाबद्दल काय वाटतंय, कोणी किती स्टार दिले जाणून घेऊया...
ट्रेड ॲनालिस्ट सतीश कुमार एम यांनी 'मेरी ख्रिसमस'चा रिव्ह्यू ट्विटरवर शेअर केला आहे. " 'मेरी ख्रिसमस' हा एक विंटेज थ्रिलरप्रमाणे चित्रपट आहे. इंटर्व्हलनंतरचा पोलिस स्टेशनचा सीन खूपच मनोरंजक आहे. चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये श्रीराम राघवन यांची खास शैली तुम्हाला पाहायला मिळेल, यात काही शंका नाही." असं म्हणत त्यांनी ट्विटर रिव्ह्यू दिलाय."
सोबतच, तरण आदर्श यांनीही 'मेरी ख्रिसमस'चा रिव्ह्यू ट्विटरवर शेअर केला आहे. " #MerryChristmas : GRIPPING. रेटिंग तीन स्टार. कथेत ट्वीस्ट आणि उत्कंठा वर्धक असा चित्रपट. खुर्चीला खिळवून ठेवणारी कथा असून दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन खूप उत्तम रित्या केलेले आहे. चित्रपटाची कथा आउट-ऑफ-द-बॉक्स असून वेळोवेळी आपली उत्कंठा वाढवते. चित्रपट तुमचे प्रचंड मनोरंजन करेल. कतरिना आणि विजयच्या अभिनयाने चित्रपटाला चार चाँद लावले आहेत. विजय सेतुपथीची उत्कृष्ट कामगिरी असून एकदम जबरदस्त अभिनय आहे. तर कतरिना कैफनेही जबरदस्त अभिनय केला आहे. "
"विनय पाठक आणि संजय कपूर यांनीही आप आपल्या भूमिकेप्रमाणे दमदार अभिनय केला. चित्रपटाची कथा जरा संथगतीने जातेय, असं जाणवतंय. जर कथा थोडी जलद झाली असती तर चित्रपट पाहण्याची मज्जा काही वेगळीच असती. त्यासोबतच चित्रपटाचे डायलॉग्जही जास्त खास दिसत नाहीत. त्यामुळे चित्रपट रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करतील अशी अपेक्षा ठेवू नका. " अशी प्रतिक्रिया रिव्ह्यू ॲनालिस्ट तरण आदर्श यांनी दिली आहे.
त्यासोबतच फिल्ममेकर विग्नेश शिवननेही इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवत चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर केला. आपल्या स्टोरीमध्ये विग्नेश म्हणतो, "मी विजय सेतुपती आणि कतरिना कैफचा अफलातून अभिनयपाहून आश्चर्यचकित झालोय. श्रीराम राघवन दिग्दर्शित 'मेरी ख्रिसमस' चित्रपट आपल्याला आल्फ्रेड हिचकॉकच्या काळात घेऊन जाते. प्रीतमच्या संगीतनेही चित्रपट हिट करण्यासाठी खारीचा वाटा उचलला आहे. चित्रपटाच्या शेवटच्या ३० मिनिटांनी सर्वांचीच मनं जिंकली आहेत. १२ जानेवारीपासून थिएटरमध्ये जाऊन चित्रपटाचा आनंद घ्या! विजय सेतुपती आम्हाला तुझा अभिमान वाटतो! तू भूमिका खूप चांगल्या पद्धतीनं साकारली आहेस."
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.