Nayanthara
NayantharaSaam Tv

Nayanthara: नेटफ्लिक्सने प्ले लिस्टमधून का काढला अभिनेत्री नयनताराचा Annapoorani चित्रपट; काय आहे प्रकरण?

Netflix : चाहत्यांच्या झोप उडवणारी अभिनेत्री नयनताराची गेल्या दिवसांपासून झोप उडालीय. याचं कारण आहे, नेटफ्लिक्सवर स्ट्रिमिंग होत असलेला तिचा चित्रपट अन्नपूर्णानी. काही दिवसांपूर्वीच हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता.
Published on

Nayanthara Annapoorani Netflix:

दाक्षिणात्य अभिनेत्री नयनताराने आपल्या अभियनाने एक वेगळी ओळख बनलवलीय. दाक्षिणात्य चित्रपटांबरोबर तिने काही हिंदी चित्रपटातही काम केलं आहे. तिच्या अभिनयन कौशल्याने तिने चाहत्यांच्या मनात राज्य केलं आहे. चाहत्यांच्या झोप उडवणारी अभिनेत्री नयनताराची गेल्या दिवसांपासून झोप उडालीय.(Latest News)

याचं कारण आहे, नेटफ्लिक्सवर (Netflix) स्ट्रिमिंग होत असलेला तिचा चित्रपट (movie) अन्नपूर्णानी. काही दिवसांपूर्वीच हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता आज नेटफ्लिक्सने हा चित्रपट आपल्या प्लेलिस्टमधून काढून टाकलाय. नेमकं काय कारण आहे, तिचा चित्रपट का काढून टाकण्यात आला, हे जाणून घेऊ..

 (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या तमिळ चित्रपटात हिंदू(Hindu) समाजाच्या भावना आणि प्रभू राम यांची बदनामी केल्यामुळे या चित्रपटाचा विरोध होऊ लागला होता. गेल्या दिवसांपूर्वीच हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाविरोधात निषेध वाढत असल्याने नेटफ्लिक्सने ही कारवाई केलीय. चित्रपट अन्नपूर्णानीमध्ये नयनतारा(Nayanthara) मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट १ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये आणि नंतर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. हिंदू आयटी सेलचे संस्थापक रमेश सोलंकी यांनी या चित्रपटाविरोधात तक्रार दाखल केली होती. तसेच विश्व हिंदू परिषदेचे (व्हीएचपी) प्रवक्ते श्रीराज नायर यांनी नेटफ्लिक्सला चित्रपट काढून टाकण्याचा इशारा दिला होता.

काय आहे वाद?

या चित्रपटात नयनतारा हिच्या तोंडून प्रभू रामविषयी एक संवाद आहे. राम हे मांसाहार करणे होते असा संवाद नयनताराचा आहे. प्रभू रामाची बदनामी या चित्रपटात केली गेल्याचा आरोप काहींनी केला. अनेकांनी या चित्रपटाला हिंदूविरोधी म्हटलंय. हा चित्रपट लव जिहादला प्रोत्साहन देणारा असल्याचा आरोप देखील काही नेत्यांनी केला होता.

या चित्रपटातील एका दृश्यात नयनतारा एका पुजाऱ्याची मुलगी दाखवण्यात आली त्यानंतर ती बुरखा घालून नमाज अदा करताना दाखवण्यात आलीय. या दृश्यांवर बोट ठेवत काही राजकीय नेत्यांना हा सिनेमा लव जिहादला प्रोत्साहन देणारा असल्याचं म्हटलं होतं. रमेश सोलंकी यांनी मुंबई पोलिस आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या चित्रपटावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.

या वादावर निर्मात्यांची प्रतिक्रिया

मोठ्या गदारोळानंतर, अन्नपूर्णानी चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक असलेल्या झी स्टुडिओजने एक निवेदन जारी केले. ज्या दृश्यांवर आक्षेप घेण्यात येत आहे, ते दृश्य काढून टाकण्यात येतील. त्यात आवश्यक ते बदल केले जातील. हे बदल होईपर्यंत हा चित्रपटा नेटफ्लिक्समधून काढून टाकला जाईल, असं निर्मात्यांनी या निवदेनात म्हटलं.

"हिंदू आणि ब्राह्मण समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा चित्रपटाचा सहनिर्माता म्हणून आमचा कोणताही हेतू नाही. याद्वारे संबंधित समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो असंही " या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान नेटफ्लिक्सने आता त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून चित्रपट काढून टाकला आहे.

Nayanthara
Annapoorani Movie: नयनताराच्या 'अन्नपूर्णानी'विरोधात मुंबईत तक्रार दाखल, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com