HanuMan Trailer
HanuMan TrailerSaam Tv

HanuMan Trailer: 'हनुमान'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज, इंडियन सुपरहिरोच्या भूमिकेत तेजा सज्जाचा खतरनाक अवतार

HanuMan Movie: 'हनुमान' चित्रपट पुढच्या वर्षी संक्रातीच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच १२ जानेवारी २०२४ ला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट प्रशांत वर्मा यांनी दिग्दर्शित केला आहे.
Published on

South Actor Tejja Sajjas:

साऊथ अभिनेता तेजा सज्जाच्या (Tejja Sajja) आगामी 'हनुमान' चित्रपटाची (Hanuman Movie) प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. तेलगू अभिनेता तेजा सज्जाच्या हनुमानचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. तो पाहिल्यापासून प्रेक्षक या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर त्यांची प्रतीक्षा आज संपली. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी हनुमानचा अंगावर काटा आणणारा हिंदी ट्रेलर रिलीज केला आहे.

भगवान हनुमानाच्या शक्तींसोबत एक नवीन भारतीय सुपरहिरोच्या रुपाने तेजा सज्जा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी संक्रातीच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच १२ जानेवारी २०२४ ला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट प्रशांत वर्मा यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर खूपच शक्तिशाली आहे. हा चित्रपट पौराणिक कथा आणि कल्पनारम्य यांचे मिश्रण आहे.

नुकताच रिलीज झालेल्या ट्रेलरमध्ये दिसत आहे की, ट्रेलरच्या सुरुवातीला तेजा सज्जा अथांग सागरामध्ये पोहताना दिसत आहे. यानंतर ट्रेलरमध्ये भगवान हनुमानाचे वर्णन करणारा आवाज येतो. त्यानंतर नदी- दरी-खोऱ्यातून बाहेर आल्यानंतर हनुमानजींची एक भली मोठी मूर्ती दिसते आणि त्यानंतर तेजा जंगलात बिबट्यापेक्षा वेगाने धावताना दिसतो. एकामागून एक हे खतरनात सीन्स तुम्हालाही थक्क करतील.

यानंतर एका गावामध्ये तेजाला मारण्यासाठी काही लोकं धावून येतात. त्यावेळ तेजा आपल्या हाताची मुठ जमिनीवर मारतो आणि शत्रू हवेत उडतात. हे सर्व पाहून गावकरी हनुमानाचा जयजयकार करतात. त्यानंतर तेजा आपल्या दोन्ही हातामध्ये हनुमानाप्रमाणे भला मोठा दगड उचलेला दिसतो. जे पाहून गावकरी हैराण होतात. मग एक घटना घडते आणि तेजा श्रीरामाची स्तुती करताना भगवान हनुमानांसारखा बलवान दिसतो. या चित्रपटामध्ये फायटिंग दाखवण्यात आली आहे. ट्रेलरमध्येही बरीच अॅक्शन पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर खूपच अप्रतिम आहे. अल्पावधितच या ट्रेलरला युट्यूबवर खूप चांगले व्ह्यूज मिळाले आहेत.

HanuMan Trailer
Gautami Patil New Song: सबसे कातील गौतमी पाटीलच्या 'घोटाळा'चा सोशल मीडियावर धुमाकूळ, तुम्ही पाहिलंत का?

दरम्यान, हनुमान चित्रपटामध्ये तेजा सज्जा व्यतिरिक्त विनय राय, अमृता अय्यर, वरलक्ष्मी सरथ कुमार, राज दीपक शेट्टी, वेनेला किशोर महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये दिसणार आहेत. 'हनुमान' हा काल्पनिक गाव अंजनदारीवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत वर्मा यांनी केले आहे. या चित्रपटाच्या टीझरनंतर ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. ते या चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत आहेत. त्यासाठी प्रेक्षकांना १२ जानेवारी २०२४ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

HanuMan Trailer
Dilip Joshi Son Wedding: जेठालालच्या रिअल लाइफ 'टप्पू'चं धुमधडाक्यात पार पडलं लग्न, लग्नाला दयाबेनची हजेरी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com