Panchak Marathi Movie: खोतांच्या घराला लागलेले पंचक सुटणार? माधुरी दीक्षितने निर्मिती केलेल्या 'पंचक' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

Panchak Marathi Movie trailer: 'पंचक'चा शानदार ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित या मराठमोळ्या जोडीने हा खास मराठी चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला आहे.
Panchak Marathi Movie trailer:
Panchak Marathi Movie trailer:Saam tv
Published On

Panchak Marathi Movie:

डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने प्रस्तुत 'पंचक' या चित्रपटाचा उत्सुकता वाढली आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रेक्षक वर्ग या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहाताना दिसत आहेत. नुकताच 'पंचक'चा शानदार ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित या मराठमोळ्या जोडीने हा खास मराठी चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला आहे. (Latest Marathi News)

'पंचक' या चित्रपटात जयंत जठार, राहुल आवटे दिग्दर्शित या चित्रपटात आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दीप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर अशी तगडी स्टारकास्ट आहे. राहुल आवटे यांनी चित्रपट लिहू लागले आहे. या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सिनेमाची कथा कशावर आधारित?

घरात पंचक लागल्याने आता कोणाचा नंबर लागणार, याची भीती घरातील सर्वांनाच भेडसावत असते. यामुळे प्रत्येक जण यावर उपायही शोधत आहे. या सगळ्यात कोणाची सर्कस सुरू आहे. तर कोणाचा ऑपेरा सुरु आहे. आता खोतांच्या घराला लागलेले 'पंचक' कसे सुटणार, हे बघताना मजा येणार एवढी नक्की आहे. हा चित्रपट नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच ५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाबद्दल डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने म्हणाल्या की, 'यापूर्वीही आम्ही एका चित्रपटाची निर्मिती केली होती. तो सिनेमा जो ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. 'पंचक' हा आमचा पहिला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 'पंचक' खरंतर सर्वार्थानेच खास आहे. या चित्रपटात तगडी स्टारकास्ट कलाकार आहेत. कथा उत्तम आहे. 'पंचक' हा त्यापैकीच एक आहे. ही एक विचित्र स्थिती आहे, परंतु अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीने ती प्रेक्षकांसमोर मांडण्यात आली आहे. हा एक कौटुंबिक आणि विनोदी चित्रपट आहे, जो प्रत्येकाने एकत्र पाहावा असा आहे.’’

'श्रद्धा आणि अंधश्रद्धा याविषयावर या चित्रपटातून ज्ञान देण्याचा आमचा अजिबात हेतू नाही. चित्रपटात मनोरंजन करणारी कथा आहे. एका घरात एखादी घटना घडते आणि त्यातून निर्माण झालेल्या भीतीमुळे आपोआपच होणारे विनोद होतात, अशी ‘पंचक’ची संकल्पना आहे.

चार्ली चॅप्लिनच्या म्हणण्यानुसार ‘लाईफ इज अ ट्रजिडी इन क्लोज अप, बट अ कॅामेडी इन लाँग शॅाट, हा चित्रपट तसाच आहे. जेव्हा आम्ही तो लिहिला तेव्हा त्या पात्रांसाठी ती भीती होती, परंतु प्रेक्षकांसाठी ही धमाल आहे, असे चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल आवटे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com