Suhana Khan on Alia Bhatt Saam Tv
मनोरंजन बातम्या

Suhana Khan on Alia Bhatt: एकच साडी दोनदा नेसणाऱ्या आलिया भट्टला सुहाना खानने मानले रोल मॉडेल, पण झाली ट्रोल

Suhana Khan News: नुकतंच सुहानाने अभिनेत्री आलिया भटची कौतुक केली आणि आलिया आपली रोल मॉडेल असल्याचं सांगितलं.

Chetan Bodke

Suhana Khan on Alia Bhatt

शाहरुख खानची (Shahrukh Khan) लेक सुहाना खान (Suhana Khan) येत्या ‘द आर्चीज’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करीत आहे. सुहाना खानचा ‘द आर्चीज’ येत्या ७ डिसेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. सध्या सुहानासह चित्रपटाची इतर स्टारकास्ट चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

नुकतंच सुहानाने अभिनेत्री आलिया भटची (Alia Bhatt) कौतुक केली आणि आलिया आपली रोल मॉडेल असल्याचं सांगितलं. ‘द आर्चीज’च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये तिने माध्यमांशी दिलखुलास संवाद साधला.

यावेळी सुहाना इव्हेंटमध्ये म्हणाली, ‘नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये, आलिया भटने तिच्या लग्नाची साडी परिधान केली होती. तिची फॅशन सेन्स नेहमीच आपल्या चाहत्यांना प्रभावित करते. तिच्यासारख्या यशस्वी आणि प्रेरणादायी अभिनेत्रीने हे करणं खरोखरंच अद्भुत आहे. तसंच हा मेसेज पोहोचवणं गरजेचंच आहे. आलियाने हा पर्यावरणाचा विचार करुन महत्वाचं पाऊल उचललं आहे.’ (Bollywood)

‘जर आलिया भट्ट आपल्या लग्नाची साडी दोनदा परिधान करु शकते. तर आपण सुद्धा आपले चांगले कपडे एखाद्या पार्टीमध्ये दोन वेळा घालू शकतो. प्रत्येकवेळीच नवीन कपडे खरेदी करावे ही गोष्ट महत्वाची नाही. नव्या कपड्यांसाठी अनेक गोष्टी खर्च होतात, या गोष्टी आपल्याला कळत नाही. त्यामुळे आलियाची ही कृती फार महत्त्वाची होती.’ जरीही सुहानाचा हा विचार खूप चांगला असला तरी, तिला नेटकरी सोशल मीडियावर ट्रोल करीत आहे. (Bollywood Actress)

सुहाना खानच्या कामाबद्दल बोलायचे तर, येत्या ७ डिसेंबरला झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटामध्ये सुहानासोबत, अगस्त्य नंदा, खुशी कपूर, वेदांग मेहरा, मिहीर अहुजा, युवराज मेंडा आणि आदिती डॅट यांच्या मुख्य भूमिका आहेत. ‘द आर्चिज’ हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.(Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT