Khushi Kapoor : जान्हवी कपूरच्या एक्स बॉयफ्रेंडला बहीण खुशी कपूर करतेय डेट? चर्चेला उधाण

बॉलिवूडचे दिग्दर्शक बोनी कपूर यांच्या मुली जान्हवी कपूर आणि खुशी कपूरही या देखील आता चंदेरी दुनियेत चर्चेत असतात.
Khushi Kapoor and her boyfriend
Khushi Kapoor and her boyfriendSaam Tv

मुंबई: बॉलिवूडचे दिग्दर्शक बोनी कपूर यांच्या मुली जान्हवी कपूर(Janhvi Kapoor) आणि खुशी कपूरही(Khushi Kapoor) या देखील आता चंदेरी दुनियेत चर्चेत असतात. दोघीही त्यांच्या वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्यामुळे कायमच प्रसिद्धीझोतात असतात. जान्हवी कपूरने आपल्या अभिनयाने कमी काळातच चित्रपटसृष्टीत हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. तर अलीकडेच धाकटी मुलगी खुशी कपूर बॉलिवूडमध्ये आपली एन्ट्री करते आहे. तत्पूर्वी खुशीने तिच्या सौदर्यांने वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Khushi Kapoor and her boyfriend
CuttPutlli Trailer Out: अक्षय कुमार करणार सीरियल किलरचा पाठलाग, खाकी वर्दीत खेळणार माइंड गेम

खूशी कपूर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. खुशी तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना अपडेट देत असते. खुशी हॉट आणि बोल्ड लूकमुळे कायमच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे फोटो काही मिनिटांतच व्हायरल होत असतात. आता पुन्हा एकदा खुशी तिच्या सोशल मीडियावरील फोटोमुळे चर्चेत आली आहे.

Khushi Kapoor and her boyfriend
Sonam Kapoor Delivery : मुलगा झाला हो...सोनम कपूरच्या घरी आला नवा पाहुणा; म्हणाली, आता आयुष्य बदललं...

अलीकडेच, खुशी कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अंकाउटवर काही फोटो शेअर केले आहेत. खुशीने कॅलिफोर्निया व्हेकेशनचे तिचे फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये खुशी अक्षत राजनसोबत दिसते आहे. खुशी कपूरने शेअर केलेल्या फोटोंवर अनेक लाईक्स कमेंट्सचा वर्षाव होत आहेत. याचदरम्यान अक्षतने केलेल्या कमेट्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे.

खुशी कपूरने हे फोटो शेअर करत तिच्या चाहत्यांना धक्काच दिला आहे. खुशीच्या या पोस्टवर अक्षतने लव्ह इमोजीस 'लव्ह यू' म्हटंल आहे. त्याला प्रत्युत्तर देत खुशीने 'आय लव्ह यू' असे म्हटले आहे. यामुळेच सध्या खुशी कपूर आणि अक्षत राजन एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

अक्षत राजन हा जान्हवी कपूरचा एक्स बॉयफ्रेंड आहे. जान्हवी आणि अक्षत बरेच दिवस एमकेकांना डेट करत होते. मात्र खुशीचे फोटो आणि फोटोवरील कमेंट्स पाहून दोघांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना ऊत आला आहे.

खुशी कपूर आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. चित्रपट निर्माता झोया अख्यतरच्या द आर्चीज या चित्रपटात ती दिसणार आहे. चित्रपट कॉमिक सीरीजवर आधारित आहे. चित्रपट २०२३ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com