CuttPutlli Trailer Out: अक्षय कुमार करणार सीरियल किलरचा पाठलाग, खाकी वर्दीत खेळणार माइंड गेम

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'कठपुतली'चा ट्रेलर रिलीज झाला आहे.
Cuttputlli Teaser
Cuttputlli TeaserSaam Tv
Published On

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा(Akshay Kumar) आगामी चित्रपट 'कठपुतली'(CuttPutlli)चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात शहरात घडणाऱ्या खुनांच्या घटनांचे गूढ शोधताना अक्षय कुमार दिसणार आहे. पूजा एंटरटेन्मेंटच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून, यामध्ये अक्षय कुमारसोबत रकुल प्रीत सिंग, सरगुन मेहता आणि चंद्रचूर सिंग हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक रणजीत तिवारी असून 'कठपुतली' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Cuttputlli Teaser
Sonam Kapoor Delivery : मुलगा झाला हो...सोनम कपूरच्या घरी आला नवा पाहुणा; म्हणाली, आता आयुष्य बदललं...

अक्षयचा हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित न होता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ०२ सप्टेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर काही वेळातच अक्षयच्या चित्रपटाबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. अक्षय कुमार या चित्रपटात सीरीयल किलरला कसा पकडतो हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत. याआधीही अक्षयचे थ्रिलर आणि सस्पेन्स चित्रपट चाहत्यांना खूप आवडले आहेत. अक्षयचा हा आगामी चित्रपट कसौलीमध्ये चित्रित करण्यात आला आहे.

Cuttputlli Teaser
Kedar Shinde : 'तो' येतोय खळखळून हसवायला...केदार शिंदेचा नवा चित्रपट 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

पूजा एंटरटेन्मेंट निर्मित हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. 'कठपुतली' हा चित्रपट सुप्रसिद्ध सोव्हिएत सीरीयल किलर अनातोली येमेलियानोविच स्लिव्हकोच्या वास्तविक जीवनातील केसचे थरारक रूपांतर आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून असा अंदाज बांधला जात आहे की पूजा एंटरटेन्मेंट 'कठपुतली'च्या माध्यमातून एक नवीन प्रकारची कथा प्रेक्षकांसमोर आणत आहेत.

'कठपुतली'चा ट्रेलर निर्माते आणि मुख्य कलाकारांनी अनोख्या पद्धतीने लाँच केला. विशेष म्हणजे, श्यामक दावरलाने कोरिओग्राफ केलेल्या या चित्रपटातील एका अॅक्टमध्ये अक्षय कुमारने 'कठपुतली' म्हणून काम केले आहे. त्याच्या या अॅक्टचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com