Shivali Parab Viral Video:‘तू मेरा तू मेरा हीरो नं.१’ वर शिवालीने केला अफलातून डान्स, ‘डान्सिंग डॉल’ म्हणत नेटकऱ्यांनी केले  कौतुक

Shivali Parab Viral Dance Video: हास्यजत्रा फेम शिवाली परबने नुकताच ‘तू मेरा तू मेरा हीरो नं.१’ या गाण्यावर एक रिल बनवून शेअर केला आहे.
Shivali Parab Viral Dance Video
Shivali Parab Viral Dance VideoInstagram

Shivali Parab Viral Dance Video

हास्यजत्रेतून शिवाली परबला ‘कल्याणची चुलबुली’ म्हणून विशेष ओळख मिळाली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवालीच्या प्रसिद्धीत फार मोठी वाढ झाली आहे. शिवालीने खूप कमी दिवसांत सोशल मीडियावर लोकप्रियता मिळवली.

सोशल मीडियाच्या माध्यामातून शिवाली नेहमीच सक्रिय असते. अनेकदा ती चाहत्यांसोबत हास्यजत्रेच्या सेटवरील बरेचसे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकतंच शिवालीने एक रिल शेअर केला आहे. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने ९० च्या दशकातल्या एका गाण्यावर व्हिडीओ शेअर केला आहे. (Actress)

Shivali Parab Viral Dance Video
Shubhankar And Amruta Engagement Photos: ‘कन्यादान’च्या रिल लाइफ कपलचा रिअल लाइफमध्ये साखरपुडा, पाहा Photos

शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शिवालीने ब्लॅक अँड रेड कलरची साडी परिधान केली आहे. तिच्या साडीवर फुलांची डिझाईन पाहायला मिळत आहे. शिवालीच्या लूकबद्दल बोलायचे तर, तिने ग्लॉसी मेकअप केला असून तिच्या लूकची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

शिवालीने ‘तू मेरा तू मेरा हीरो नं.१’ असं कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये तिने खूपच कातील अदा देत डान्स केला. करिश्माने गाण्यामध्ये ज्याप्रमाणे हुक स्टेप केल्या आहेत, अगदी तशाच स्टेप्स तिने व्हिडीओमध्ये केल्या आहे. तिच्या हुक स्टेपने चाहत्यांचे मन जिंकले आहे. हा व्हिडीओ शिवालीने हास्यजत्रेच्या सेटवरुन शेअर केला. (Social Media)

शिवालीला चाहत्यांसह हास्यजत्रेतल्या सेलिब्रिटी मित्रांनी व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स केलेल्या दिसत आहे. ‘तू नं १’, ‘वाह मेरी शिवा’ म्हणत एका चाहत्याने तिच्या व्हिडीओचं कौतुक केलं. तर आणखी एकाने तिला ‘डान्सिंग डॉल’ म्हणत तिला कमेंट केली आहे. तर अनेकांनी तिच्या सौंदर्याचे आणि तिच्या डान्सचे कौतुक केले आहे. शिवाली अनेकदा सोशल मीडियावर वेगवेगळ्या डान्सचे व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. (Marathi Actress)

Shivali Parab Viral Dance Video
'Animal'मधील रणबीर आणि रश्मिकाच्या इंटिमेट सीन्सवर सेन्सॉर बोर्डाची कात्री, या हिंदी शब्दावरही आक्षेप

शिवाली परबविषयी सांगायचे तर, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवाली परब घराघरांत पोहोचली आहे. या कार्यक्रमामुळे शिवालीला 'लवली' ही नवी ओळख मिळाली. हास्यजत्रेतले शिवालीचे अनेक कॅरेक्टर चाहत्यांमध्ये फेमस आहेत. शिवाली अवली कोहली, चिकचिक बूम, नम्रताची बहीण बनून पृथ्वीकला त्रास देणं, शिवाली हे खरंय का म्हणत वडिलांना सतावणारी अतरंगी पोरगी, शाळेतली आगाऊ विद्यार्थिनी असे शिवालीचे अनेक कॅरेक्टर तिचे फेमस आहेत. (Entertainment News)

Shivali Parab Viral Dance Video
Tatyavinchu Name Untold Story: ‘झपाटलेला’च्या दिग्दर्शकांना ‘तात्याविंचू’ हे नाव कसं सुचलं? महेश कोठारेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com