९० च्या दशकातील मराठी चित्रपटांची आजही प्रेक्षकांवर भुरळ कायम आहे. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘झपाटलेला’. महेश कोठारे दिग्दर्शित ‘झपाटलेला’ने मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. चित्रपटाचे आजही नाव काढले तरी, आपल्या समोर नक्कीच ‘तात्याविंचू’ उभा राहतो. हे नाव ऐकले तरी नाव कसं सुचलं?, नावामागील हेतू काय?, त्या नावाचा जन्म कसा झाला? हा प्रश्न सर्वांनाच पडतो. या प्रश्नाचं उत्तर खुद्द दिग्दर्शक महेश कोठारेंनीच दिलं आहे. (Marathi Film)
चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, किशोरी आम्बिये, रविंद्र बेर्डे, विजय चव्हाणसह अनेक दिग्गज सेलिब्रिटी चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत होते. चित्रपटाने सर्वच कलाकारांना एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली आहे. खरंतर ‘झपाटलेला’ चित्रपट हा एका हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे. ‘चाईल्डस प्ले’ चित्रपटाचा हा मराठी रिमेक आहे. चित्रपट बनवताना दिग्दर्शकांना खलनायकाचे नाव काही तरी हटके हवे होते. त्यावेळी त्यांना खूप दिवसांपूर्वी पाहिलेला ‘रेड स्कॉर्पियन’ हॉलिवूड चित्रपट आठवला.
‘रेड स्कॉर्पियन’ चा अर्थ लाल विंचू असा होतो. दिग्दर्शक महेश कोठारे यांना ‘तात्याविंचू’ हे नाव, इंग्रजी चित्रपट ‘रेड स्कॉर्पियन’ आणि त्यांच्या मेकअप मॅनचं नाव ‘तात्या’ यांच्या कॉम्बिनेशनमधून तयार केलं. आणि ‘तात्याविंचू’ आपल्या भेटीला आला. या नावाची आजही प्रेक्षकांमध्ये दहशत कायम आहे. असं एका बाहुल्याचं विचित्र ऐकून सर्वच चकित झाले. या ‘तात्याविंचू’ची क्रेझ फक्त मराठी चित्रपटांमध्येच नाही तर हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेतही त्याची क्रेझ कायम पाहायला मिळाली. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.