Ashi Hi Banwa Banwi Remake: ‘अशी ही बनवाबनवी’चा रिमेक येणार?, कलाकारांची लिस्ट आली समोर

Tejaswini Pandit Interview: अभिनेत्री आणि निर्माती तेजस्विनी पंडितने चाहत्यांना ‘अशी ही बनवाबनवी’च्या रिमेकबाबत मोठी हिंट दिली आहे.
Ashi Hi Banwa Banwi Remake
Ashi Hi Banwa Banwi RemakeSaam Tv
Published On

Tejaswini Pandit On Ashi Hi Banwa Banwi Remake

आजही सोशल मीडियावर कायमच ‘अशी ही बनवाबनवी’ची चर्चा होताना दिसते. अनेकदा सोशल मीडियावर त्याचे मीम्स सुद्धा व्हायरल होताना पाहायला मिळते. कित्येकदा तो चित्रपट पाहिला तरी आपल्याला पोट धरुनच हासायला नक्की येते. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर १९८८ मध्ये रिलीज झाला होता. अनेक वर्षांनंतर या चित्रपटाच्या सिक्वेलची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. नुकतंच अभिनेत्री आणि निर्माती तेजस्विनी पंडित हिने एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत अभिनेत्रीने चाहत्यांना रिमेकबाबत मोठी हिंट दिली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ashi Hi Banwa Banwi Remake
Dunki Drop 1 Teaser: 'किंग खान'च्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली! 'डंकी'चा टीझर आऊट, शाहरुखने वाढदिवशी चाहत्यांना दिलं खास गिफ्ट

अलीकडेच अभिनेत्रीने ‘लोकमत फिल्मी’या एंटरटेनमेंट चॅनलला तिने मुलाखत दिली. दरम्यान, मुलाखतीत ‘अशी ही बनवाबनवी’चा सीक्वेल आला तर अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या भूमिकेत कोणत्या कलाकाराला पाहायला आवडेल, याबद्दल तेजस्विनीने सांगितले आहे.

“मी लक्ष्मीकांत बेर्डेंच्या भूमिकेत अभिनय बेर्डेलाच कास्ट करणार आहे. कदाचित तो आपल्या वडिलांचे पात्र अगदी व्यवस्थित साकारेल असं मला वाटतं. सचिन पिळगांवकर यांनी ‘अशी ही बनवाबनवी’ मध्ये स्त्री भूमिका खूपच सुंदर साकरली होती. त्या भूमिकेमध्ये सचिन सर खूप गोड दिसत होते. जर मी चित्रपटाच्या रिमेकचा विचार केला तर, सचिन सरांच्या भूमिकेत मी सिद्धार्थ चांदेकरकडे पाहते. कारण तो खूपच चिकना दिसतो. तो स्त्री भूमिका खूप छान करेल, असं मला वाटतं. तर अशोक मामांच्या भूमिकेसाठी मी अमेय वाघला कास्ट करेल.” असं तेजस्विनी मुलाखतीमध्ये म्हणाली.

आजही चित्रपटातले संवाद, विनोदी किस्से आणि त्यातले एव्हरग्रीन गाणे यांची नेहमीच चर्चा होताना दिसते. त्यातले अनेक गाण्यांचे रिमेक सुद्धा आपण ऐकले असतील. गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चित्रपटाच्या सिक्वेलची चर्चा झाली होती, पण त्यानंतर त्याबद्दल काही अपडेट्स आले नाही. (Marathi Film)

चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, प्रिया बेर्डे, निवेदिता सराफ, सुप्रिया पिळगांवकर, सिद्धार्थ रे सह दमदार कलाकारांची फळी चित्रपटामध्ये दिसली होती. या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने ३ कोटींच्या आसपास आकडा गाठला होता. आता या चित्रपटाच्या रिमेकमध्ये कोणकोणते कलाकार दिसणार?, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Actress)

Ashi Hi Banwa Banwi Remake
Shah Rukh Khan Bday: 'किंग खान'च्या वाढदिवसानिमित्त 'मन्नत'बाहेर चाहत्यांकडून जबरदस्त सेलिब्रेशन, मध्यरात्री ट्वीट करत शाहरूखने मानले सर्वांचे आभार

तेजस्विनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, आतापर्यंत मराठी चित्रपटांसह बॉलिवूडमध्येही तिने कामं केलं आहे. ‘अगं बाई अरेच्चा’, ‘तू ही रे’, ‘येरे येरे पैसा’सह अनेक चित्रपटांमध्ये तिने प्रमुख भूमिका साकारली. अभिनेत्रीसोबतच ती एक प्रसिद्ध निर्मातीसुद्धा आहे. ‘अथांग’ या वेबसीरीजच्या माध्यमातून तिने निर्माती म्हणून प्रेक्षकांच्या समोर आली. गेल्या काही दिवसांपूर्वीच तेजस्विनीचा ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट रिलीज झाला. (Entertainment News)

Ashi Hi Banwa Banwi Remake
Shah Rukh Khan Birthday: बॉलिवूडचा 'रोमान्स किंग' शाहरुख गौरीच्या प्रेमात कसा पडला?, अभिनेत्याने एकदा नाही तर ३ वेळा केलं लग्न

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com