मराठी चित्रपटसृष्टीतील एव्हर्ग्रीन अभिनेता म्हणजे अशोक मामा उर्फ अशोक सराफ. अशोक सराफ यांनी मराठी चित्रपटसृष्टीला खूप चांगला दर्जा मिळवून दिला आहे. अशोक मामा त्यांच्या मिश्किल स्वभावासाठी, उत्तम अभिनयासाठी प्रसिद्ध तर आहेतच पण त्यांच्या डान्समुळेही ते ओळखले जातात. ८० च्या दशकातील त्यांचे चित्रपट आणि त्यातील गाणी आजही प्रेक्षकांना कायमच आठवणीत आहेत. नुकतच अभिनेता अंशुमन आणि त्याच्या पत्नीने त्यांच्या 'तुझी माझी जोडी जमली गं' या गाण्याचं रिक्रिएशन केलं आहे.
'माझा पती करोडपती' चित्रपटातील 'तुझी माझी जोडी जमली' या गाण्यावर प्रत्येकाने ताल धरला असेलच. याच गाण्याचं रिक्रिएशन आता अभिनेता अंशुमन विचारे आणि त्याच्या पत्नीने केलं आहे.
या दोघांनीही अशोक मामा आणि किशोरी शहाणे यांच्या गाण्यावर डान्स केला आहे.लग्न असो किंवा वरात... 'तुझी माझी जोडी जमली' हे गाणं वाजतंच. 'माझा पती करोडपती' या चित्रपटाला नुकतेच ३५ वर्ष पूर्ण झाली आहेत.
चित्रपट प्रदर्शित होऊन जरीही इतके वर्ष झाले तरी, देखील या चित्रपटातील गाण्याची प्रेक्षकांमध्ये क्रेझ कमी झालेली नाही. नुकताच या गाण्यावर अभिनेता अंशुमन विचारे आणि त्याच्या पत्नीने डान्स केलेला व्हिडीओ अभिनेत्याने शेअर केला असून व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान चर्चेत आलेला आहे.
'तुझी माझी जोडी जमली' या गाण्याच्या हुक स्टेप सर्वांच्याच लक्षात असतील. खऱ्या गाण्यातील हुबेहुब स्टेपवर या दोघांनी डान्स केला आहे. निसर्गरम्य ठिकाणी हा व्हिडिओ शुट केला आहे. या दोघांचा हा डान्सचा व्हिडिओ पाहून असं वाटतंय की, आताच्या काळात जर अशोक मामा आणि किशोरी शहाणे यांनी डान्स केला असता तर तो असाच असता.
अंशुमनने सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.' पहिल्यांदाच मी आणि बायको..... थोडीशी गंमत....आयुष्यभर ज्या गाण्यांवर आणि ज्या पिढीवर प्रेम करत आलो त्याची जागा दुसरं कुणीच आणि काहीच घेऊ शकत नाही'. असं कॅप्शन दिले आहे.
जे गाणं लहानपणापासून ऐकत आलो त्या गाण्यावर डान्स करतानाच्या भावना अंशुमनने व्यक्त केल्या आहेत. याचबरोबर अंशुमनने हा व्हिडिओ शुट करतानाचे सीन्सचाही व्हिडिओ शेअर केला आहे.
अंशुमन विचारे हा उत्तम अभिनेता आहे. त्याच्या कॉमेडीचा टायमिंग सर्वांनाच भावतो. तो सोशल मीडियावरही सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याच्या मुलीचे व्हिडिओ शेअर करत असतो.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.