Rang Maza Vegla Off Air: 'रंग माझा वेगळा' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, ‘या’ तारखेला होणार शेवटचा एपिसोड टेलिकास्ट

Rang Maza Vegla Off Air: प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
Rang Maza Vegla Off Air
Rang Maza Vegla Off AirSaam Tv
Published On

Rang Maza Vegla Off Air

मराठी मालिकांची प्रेक्षकांमध्ये वेगळीच क्रेझ आहे. घराघरात मराठी मालिका पाहिल्या जातात. प्रेक्षक मालिकेतील प्रत्येक पात्र त्यांच्या कुटुंबातील असल्यासारख समजतात. असंच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा या मालिकेने प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन केले. टीआरपीच्या स्पर्धेत नेहमी अव्वल क्रमांकावर ठरणारी मालिका आहे. मालिकेतील दीपा-कार्तिकच्या लव्ह स्टोरीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले. मालिकेचा शेवटचा भाग आज शूट होत आहे. कलाकारांनी मालिकेचे काही फोटो सोशल मीडियावर टाकून जुन्या आठवणींना उजाला दिला आहे.

Rang Maza Vegla Off Air
Rajinikanth Surprise Visit: सुपरस्टार रजनीकांत दिला जुन्या आठवणींना उजाळा; थेट गाठलं बंगळुरूमधील बेस्ट डेपो

'रंग माझा वेगळा' मालिका सुरू झाल्यावर काही काळातच प्रेक्षकांची मने जिंकली. मालिकेतील कलाकार दिपा, कार्तिक, सौंदर्या इनामदार, दिपिका, कार्तिकी, श्वेता घराघरात पोहचले. मालिकेत अनेक ट्विस्ट पाहायला मिळाले. मालिकेत मध्यंतरी १४ वर्षाचा लीप पाहायला मिळाला. मध्यंतरी मालिकेतील बदललेल्या कथानकामुळे टीआरपीच्या रेटिंग्सवर त्याचा परिणाम झाला.

कलाकार मालिकेचा शेवटचा दिवसाचे शुटिंग करत आहे. मालिकेतील दीपा, श्वेता, दिपिका, कार्तिकीने सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. मालिकेतील दीपा म्हणजेच रेश्मा शिंदेने मालिकेच्या स्क्रिप्टचा फोटो शेअर करुन त्यावर 'दीपा' असे लिहले होते.

Rang Maza Vegla Off Air
Jailer Controversy: रजनीकांतच्या ‘जेलर’ला मोठा झटका; RCB जर्सीचा सीन काढावा लागणार, काय आहे कारण?

मालिकेतील श्वेता म्हणजे अनघा अतुलने विठ्ठल रखुमाईचा फोटो शेअर करत ‘श्वेता बनण्याचा शेवटचा दिवस’.‘प्रत्येक शेवट एक नवीन सुरुवात आहे.’ असं फोटोवर लिहलं आहे. तर मालिकेतील दीपिका आणि कार्तिकीने सेटवरील फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

‘रंग माझा वेगळा’ मालिकेच्या जागी आता 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका प्रक्षेपित होणार आहे. मालिकेत तेजश्री प्रधान आणि राज हंचनाळे प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com