सध्या सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘जेलर’ चित्रपट तुफान चर्चेत आला आहे. चित्रपटाने अवघ्या काही दिवसातच कोट्यवधींचा गल्ला जमावला असून चित्रपटाने आतापर्यंत जगभरात ६५० कोटींचा टप्पा गाठला आहे. तर गेल्या तीन आठवड्यापासून हा चित्रपट भारतात चांगलीच कमाई करीत आहे.
चित्रपटाने भारतामध्ये एकूण ३२० कोटींचा टप्पा गाठला आहे. कमाईच्या बाबतीत चित्रपटाची तुफान चर्चा होत असताना, एका कारणामुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटातील एका सीनवर आक्षेप घेण्यात आला असून सीनमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर हे प्रकरण हायकोर्टात गेलं.
चित्रपटाची फक्त देशातच नाही तर, परदेशातही क्रेझ कायम आहे. सध्या एका सीनमुळे चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटातील एका सीनवर आक्षेप घेण्यात आला असून सध्या हे प्रकरण हायकोर्टामध्ये गेलं आहे. दरम्यान, कोर्टाने या प्रकरणी चित्रपटाच्या निर्मात्यांना १ सप्टेंबरपर्यंत चित्रपटातील एका सीनमधून आरसीबीची जर्सी काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच कोर्टाने, निर्मात्यांना तो सीन जेव्हा चित्रपट टेलिव्हिजनवर आणि ओटीटीवर प्रदर्शित होईल, त्यावेळीही दाखवण्यात येवू नये असे देखील सांगितले.
रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडला ज्यावेळी कळलं की, ‘जेलर’ चित्रपटात एक असा सीन आहे, ज्यामध्ये एका कॉन्ट्रॅक्ट किलरने आरसीबी जर्सी घातलेल्या महिलेबद्दल अपमानजनक विधान करतांना दिसत आहे, त्यावर आक्षेप घेत त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. या सीनमुळे त्याच्या ब्रँडची प्रतिमा खराब होण्याची आणि प्रायोजकांचे नुकसान होण्याची शक्यता होती.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.