Rajinikanth Surprise Visit: सुपरस्टार रजनीकांत दिला जुन्या आठवणींना उजाळा; थेट गाठलं बंगळुरूमधील बेस्ट डेपो

Rajinikanth Visited Bus Depo : रजनीकांत यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत मंगळवारी बंगळुरू मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (बीएमटीसी) बस स्टँडला भेट देत दिली.
Rajinikanth Surprise Visit
Rajinikanth Surprise VisitSaam Tv
Published On

Rajinikanth Visited Bust Depo Where He Used Work

सुपरस्टार रजनीकांत यांचा जेलर हा चित्रपट १० ऑगस्टला प्रदर्शित झाला. चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर ६०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी अचानक रजनीकांत गायब झाले होते. रजनीकांत हिमालयात गेले होते. त्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणांना भेटी दिल्या. आज रजनीकांत यांनी पुन्हा एकदा त्यांच्या चाहत्यांना धक्का दिला आहे.

सुपरस्टारने जुन्या आठवणींना उजाळा देत मंगळवारी बंगळुरू मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (बीएमटीसी) बस स्टँडला भेट देत दिली. रजनीकांत याच शहरात एकेकाळी बस कंडक्टर म्हणून काम करत होते.

Rajinikanth Surprise Visit
Malaika Arora Onam Celebration: पारंपारिक लूक अन् अभिनेत्रीचे निस्सिम सौंदर्य, मलायकाने साजरा केला खास अंदाजात ‘ओणम’

72 वर्षीय रजनीकांत यांनी सर्वांना आश्चर्यचकित केले. जयनगर येथील बसस्थानकावर BMTC ड्रायव्हर, कंडक्टर आणि इतर कर्मचार्‍यांसोबत आनंदाने काही क्षण घालवले. शिवाजी राव गायकवाड हे एकेकाळी या शहरात बस कंडक्टर म्हणून काम करत होते.

तामिळ मधील दिग्गज दिग्दर्शक दिवंगत के बालचंदर त्यांना पाहिले आणि त्यांचे नाव रजनीकांत ठेवले. 1975 मध्ये आलेल्या 'अपूर्व रागंगल' या हिट चित्रपटात अभिनेत्याला पहिला ब्रेक देखील दिला. कमल हासन यांनी या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारली होती.

यावेळी रजनीकांत खूपच नॉस्टॅल्जिक झाले होते. BMTC च्या ट्रॅफिक ट्रान्झिट मॅनेजमेंट सेंटर (TTMC) कर्मचार्‍यांनी त्यांना अभिवादन केले आणि त्याच्याभोवती गोळा झाले. रजनीकांत यांनी तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी गप्पा मारल्या आणि सेल्फी देखील काढले. अभिनेत्याने बस डेपोच्या जवळ असलेल्या राघवेंद्र स्वामी मठालाही भेट दिली.

रजनीकांत यांनी 16व्या-17व्या शतकातील संत-कवीचे चरित्र 'श्री राघवेंद्रर' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. हिन्दुस्तान टाइम्स यांनी दिलेल्या वृतात त्यांनी लिहिले आहे की, रजनीकांतने त्यांचे बालपण बेंगळुरूमध्ये गेले. चित्रपट सृष्टीतील त्याच्या कारकिर्दीला सुरुवात करण्यापूर्वी वयाची 22 वर्षे येथे होते. त्यानंतर ते चेन्नईला शिफ्ट झाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com