Ashi Hi Banvabanvi: ३४ वर्षानंतरही 'हा' चुकलेला संवाद बराच गाजलेला

कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावरील पकड कायम ठेवली आहे. चित्रपटातील किस्से, संवाद अजूनही तितकेच हसू आणते.
Ashi Hi Banwa Banvi
Ashi Hi Banwa BanviSaam Tv
Published On

मुंबई: अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर यांची जेवढी पडद्याआड मैत्री होती, तशीच मैत्री पडद्यावरही गाजलेली होती. या त्रिकुटाने पडद्यावर घातलेला कल्ला हा सर्व प्रेक्षकांना चांगलाच ठाऊक आहे. गेल्या ३४ वर्षांपूर्वी मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात तुफान गाजलेला आणि त्याहूनही अधिक लोकप्रिय ठरलेला चित्रपट म्हणजे 'अशी ही बनवाबनवी' होय. चित्रपटाला आज यशस्वी ३४ वर्ष पूर्ण झाले आहेत.

Ashi Hi Banwa Banvi
HariOm: 'हरिओम' मधील 'सुरु झाले पर्व नवे' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

चित्रपटातील एकूण गाण्यांनी आणि डायलॉग्सने प्रेक्षकांच्या मनावरील पकड अजूनही कायम ठेवली आहे. चित्रपट पहायला अजूनही कंटाळवाना वाटत नाही. काही दशकांचा काळ सरला तरी चित्रपटाचा आणि चित्रपटातील कलाकृतीचा चाहतावर्ग कमी झालेला नाही. कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावरील पकड कायम ठेवली आहे. चित्रपटातील किस्से, संवाद अजूनही तितकेच हसू आणते. अशोक सराफ यांनी एका मुलाखतीत किस्सा सांगितला होता, तो चुकलेला डायलॉग हिट ठरला आहे.

Ashi Hi Banwa Banvi
'ब्रह्मास्र'नंतर आता 'ब्रह्मास्त्र २' मध्ये असणार दिपीका पदुकोण? अयान मुखर्जीने मौन सोडत दिली 'ही' प्रतिक्रिया

चांगल्या गोष्टीसाठी बोललेले खोटे चांगले असते असे म्हणतात. चित्रपटात सचिन पिळगांवकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांना राहायला घर मिळावे यासाठी ते एका स्त्रीच्या रुपात वेशांतर करतात. वेशांतरानंतर लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ यांच्या पत्नीची भूमिका साकारतात. घरमालकीणीला ओळख करुन देताना, अशोक सराफ चुकून 'हा माझा बायको पार्वती' असे म्हणतात. हा डायलॉग समोर आला तरी प्रेक्षक पोट धरुन हसतात. पण चित्रपटात तो संवाद नव्हता.

Ashi Hi Banwa Banvi
National Cinema Day: सिनेमा दिनी देशभरात इतक्या चित्रपटगृहात पाहिला ७५ रु सिनेमा

ज्या ओघात चित्रपटातील संवाद येतात त्या ओघात संवाद बोलता बोलता लक्ष्मीकांत पटकन पुढे जातात. परंतू या संवादाने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. प्रेक्षकांच्या तोंडपाठ चित्रपटातील बरेच संवाद आहेत. चित्रपट नेहमी नेहमी जरी पाहिला तरी चित्रपटातील हास्यकल्लोळ कधी कमी होत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com