National Cinema Day: सिनेमा दिनी देशभरात इतक्या चित्रपटगृहात पाहिला ७५ रु सिनेमा

२३ सप्टेंबर रोजी देशभरातील चित्रपटगृहामध्ये फक्त ७५ रुपयात प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचा आनंद मिळत आहे.
National Cinema Day
National Cinema Day Saam Tv
Published On

मुंबई: राष्ट्रीय सिनेमा दिवसाचे (National Cinema Day) औचित्य साधत मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (Multiplex Association Of India) ने प्रेक्षकांचे खास स्वागत करण्याचा निर्णय घेतला आहे. २३ सप्टेंबर रोजी देशभरातील चित्रपटगृहामध्ये फक्त ७५ रुपयात प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचा आनंद मिळत आहे. सर्वात आधी १६ सप्टेंबरला राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा करण्यात येणार होता. परंतू नंतर २३ सप्टेंबर तारीख ठरवण्यात आली. निर्माते, कलाकार आणि चित्रपटसृष्टीतील काही खास मंडळी यांच्यात राष्ट्रीय सिनेमा दिवसाचा चांगलाच उत्साह आहे.

National Cinema Day
Jhalak Dikhala Ja: अंगूरी भाभीने केला 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीचा लूक, लूक जबरदस्त चर्चेत

कोरोना महामारीच्या आधी चित्रपटगृहांमध्ये अनेकदा चित्रपट हाऊसफुलचा बोर्ड लागत असायचे. अनेकदा तर प्रेक्षकांना तिकीटच मिळत नव्हते. परंतू कोरोना महामारीमध्ये लॉकडाऊन लागल्यापासून प्रेक्षकवर्ग ओटीटीच्या मदतीने चित्रपट पाहायचे. हळूहळू लोकांनी सिनेमागृहात चित्रपट पाहण्याचे बंद झाले. त्याचा परिणाम चित्रपट निर्मात्यांवर खूप होत आहे. अशातच प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात येण्याकरिता मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने भारतातील अनेक चित्रपटगृहांमध्ये ७५ रुपये तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे.

National Cinema Day
किंग खानच्या 'जवान' मध्ये थलपतीची होणार एन्ट्री? एटलीच्या सोशल मीडिया पोस्टने वेधलं लक्ष

कोरोना महामारीमुळे संपूर्ण उद्योगधंदे प्रभावित झाले आहेत. लॉकडाऊनच्या काळात चित्रपटगृहे पूर्णपणे बंद होते. प्रेक्षकांच्या सुरक्षेची काळजी घेत लॉकडाऊनचे नियम शिथिल करताना ५० टक्के क्षमतेने चित्रपटगृहे उघडण्यात आली होती. त्याच वेळी, चित्रपटसृष्टी देखील वाईट टप्प्यावर तोंड देत पुन्हा एकदा उदयास येण्याच्या प्रयत्नात आहे. बर्‍याच दिवसांचे बनवलेले चित्रपट प्रदर्शित होत असले तरी चित्रपटगृहात शांतता आहे. पूर्वीचे वैभव परत येत नाही.

National Cinema Day
The Journey Of India: बिग बी 'या' कार्यक्रमातून घेणार देशाचा गेल्या ७५ वर्षांचा आढावा !

याचसाठी मल्टिप्लेक्स असोसिएशनने राष्ट्रीय सिनेमा दिनी कमी दरात तिकिटे मिळण्याचा प्रेक्षकांना मोठा फायदा होणार असल्याचे मत आहे. मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया FICCI म्हणजेच फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अंतर्गत येते. त्याची स्थापना 2002 मध्ये झाली. देशभरात चार हजार स्क्रीन्स असलेल्या या असोसिएशनशी सुमारे 500 मल्टिप्लेक्स संबंधित आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com