Shubhankar And Amruta Engagement Photos: ‘कन्यादान’च्या रिल लाइफ कपलचा रिअल लाइफमध्ये साखरपुडा, पाहा Photos

Shubhankar And Amruta Engagement: रिल लाईफमध्ये एकमेकांसोबत लग्नगाठ बांधल्यानंतर अमृता बने आणि शुभंकर एकबोटे लवकरच रिअल लाईफमध्येही लग्नगाठ बांधणार आहे.
Shubhankar Ekbote And Amruta Bane Engagement Photos
Shubhankar Ekbote And Amruta Bane Engagement PhotosInstagram
Published On

Shubhankar Ekbote And Amruta Bane Engagement Photos

सध्या अनेक मराठी सेलिब्रिटी आपल्या प्रेमाची कबुली देताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी मुग्धा- प्रसाद, अमृता- प्रसाद आणि कार्तिकी- आशिष यांनी सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली देत रिलेशनमध्ये असल्याचे सांगितले. यामधील काहींनी लग्न तर काहींनी साखरपुडा उरकला. आता या यादीमध्ये आणखी एका सेलिब्रिटी कपलचं नाव जोडले आहे. नुकताच त्यांचा साखरपुडाही पार पडला. ही जोडी म्हणजे ‘कन्यादान’ मालिकेमध्ये वृंदा आणि राणा. (Marathi Film)

Shubhankar Ekbote And Amruta Bane Engagement Photos
Tatyavinchu Name Untold Story: ‘झपाटलेला’च्या दिग्दर्शकांना ‘तात्याविंचू’ हे नाव कसं सुचलं? महेश कोठारेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

रिल लाईफमध्ये एकमेकांसोबत लग्नगाठ बांधल्यानंतर अमृता आणि शुभंकर लवकरच रिअल लाईफमध्येही लग्नगाठ बांधणार आहे. सन मराठी वरील ‘कन्यादान’ मालिकेमध्ये या दोघांनीही प्रमुख भूमिका साकारली होती. या मालिकेच्या माध्यमातून दोघांचीही ओळख झाली. त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. लवकरच येत्या काही दिवसात ते लग्नबंधनात अडकणार आहेत. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Engagement Photos)

‘कन्यादान’ मालिकेमध्ये वृंदा आणि राणा या हिट जोडीने आपल्या रिअल लाईफमध्ये एकमेकांसोबत साखरपुडा केला आहे. अमृता बने आणि शुभंकर एकबोटेच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यावेळी त्यांच्या अनेक सेलेब्रिटी मित्रांनी हजेरी लावली होती. त्यांनी शेअर केलेल्या फोटोची बरीच चर्चा होत आहे. (Social Media)

साखरपुड्याला अमृता आणि शुभंकरने पारंपारिक कपडे परिधान केले होते. अमृताने हिरव्या रंगाची साडी तर शुभंकरने फिक्कट हिरव्या रंगाचा कुर्ता घातला होता. सध्या त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहे. (Entertainment News)

Shubhankar Ekbote And Amruta Bane Engagement Photos
Gururaj Jois: बॉलिवूडमधल्या पडद्यामागचा 'चेहरा' हरपला; 'लगान'च्या सिनेमॅटोग्राफरचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com