सुहाना खान आणि अगस्त्य नंदा करणार बॉलीवुड मध्ये एकत्र एन्ट्री?

झोया कॉमिक बुकच्या भारतीय रुपांतरणावर काम करत आहे. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल. याबाबत अशी चर्चा आहे की, चित्रपटात तीन मोठ्या स्टार किड्स लाँच करण्यासाठी सर्व तयारी केली जात आहे.
सुहाना खान आणि अगस्त्य नंदा करणार बॉलीवुड मध्ये एकत्र एन्ट्री?
सुहाना खान आणि अगस्त्य नंदा करणार बॉलीवुड मध्ये एकत्र एन्ट्री?Saam Tv
Published On

मुंबई: चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक झोया अख्तर तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. ती लवकरच आर्ची या आंतरराष्ट्रीय कॉमिक बुकवर चित्रपट बनवणार आहे. सध्या, झोया या कॉमिक बुकच्या भारतीय रुपांतरणावर काम करत आहे. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल. याबाबत अशी चर्चा आहे की, चित्रपटात तीन मोठ्या स्टार किड्स लाँच करण्यासाठी सर्व तयारी केली जात आहे. वास्तविक, झोया या चित्रपटासाठी नवीन चेहऱ्यांच्या शोधात होती, म्हणून तिने हा मोठा निर्णय घेतला आहे.

हे देखील पहा-

शाहरुख खान ची लाडकी मुलगी सुहाना खान हिच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चेनंतर आता अमिताभ बच्चन यांचा नात अगस्त्य नंदा बॉलिवूडमध्ये करणार आहेत. एका वेबसाईटच्या अहवालानुसार, अगस्त्याने या भूमिकेवर त्याने कामही सुरू केले आहे. सर्व जर योग्य झाले तर ती झोयाच्या नेटफ्लिक्ससाठी आर्ची या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटात मुख्य चेहरा असू शकते.

झोया अख्तर या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत आहे आणि या चित्रपटाची अधिकृत तयारी या वर्षाच्या अखेरीस सुरू होऊ शकते.

सुहाना खान आणि अगस्त्य नंदा करणार बॉलीवुड मध्ये एकत्र एन्ट्री?
असं गलिच्छ राजकारण फक्त शिवसेनाच करु शकते: रावसाहेब दानवे...(पहा व्हिडीओ)

तत्पूर्वी, एक वेबसाईटशी बोलताना एका सूत्राने सांगितले होते, 'काही मित्रांची कथा चित्रपटात दाखवली जाणार आहे. यासाठी सुहाना व्यतिरिक्त झोया आणखी काही तरुण कलाकारांच्या शोधात आहे. उर्वरित कलाकारांचा शोध अद्याप झोया करत आहे. पण झोयाने सुहानाला कास्ट करण्याचा विचार केला आहे. मात्र, अद्याप कोणत्याही स्टार किडकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

झोया अख्तर आजकाल तिच्या अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. आर्ची व्यतिरिक्त, ती सलीम-जावेद माहितीपटावर काम करत आहे जी नेटफ्लिक्सवर रिलीज होईल.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com