Shreyas Talpade Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shreyas Talpade: १४ डिसेंबरच्या रात्रीनंतर सर्वकाही बदललं...; श्रेयसनं सांगितलं हृदयविकाराच्या झटक्यानंतरच आयुष्य

Shreyas Talpade Interview: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता म्हणून श्रेयस तळपदेला ओळखले जाते. श्रेयस तळपदेला मागील वर्षी १४ डिसेंबर २०२३ रोजी हृदयविकाराच झटका आला होता. यामुळे मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर श्रेयसने हृदयविकारच्या झटक्यानंतर त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलल्याचे सांगितले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता म्हणून श्रेयस तळपदेला ओळखले जाते. श्रेयस तळपदेला मागील वर्षी १४ डिसेंबर २०२३ रोजी हृदयविकाराच झटका आला होता. यामुळे मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला होता. यानंतर श्रेयसची तब्येत आता बरी आहे. श्रेयसच्या चाहत्यांनी त्याच्या तब्येतीबद्दल अनेकदा चिंता वर्तवली आहे. त्यानंतर श्रेयसने हृदयविकारच्या झटक्यानंतर त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलल्याचे सांगितले आहे. (Shreyas Talpade Talks About How Life Change After Heart Attack)

श्रेयसने नुकतीच पिंकविलाला मुलाखत दिली आहे. त्यात त्याने हार्ट अॅटॅकनंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदलल्याचे सांगितले आहे. मुलाखतीत त्याला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर आयुष्य कसं बदललं आहे, हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर श्रेयसने सांगितले की, 'मी आधीपेक्षा खूप जास्त शांत आणि रिलॅक्स झालो आहे. यामुळे तुम्ही तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या इतर गोष्टीदेखील पाहू शकतात. पूर्वी आधी घोड्यासारखा पळायचो. प्रत्येक गोष्ट मी पूर्णपणे लक्ष केंद्रित करुन करायचो. मी फक्त माझे करिअर चांगले करण्यासाठी प्रयत्न करायचो. तुम्ही करिअरमध्ये चांगल्या चित्रपटात, चांगल्या दिग्दर्शकासोबत तुमच्या क्षमतेनुसार उत्कृष्ट काम करत असतात. परंतु अचानक काहीतरी घडतं आणि तुमचं पूर्ण आयुष्यचं बदलून जातं. हे आयुष्य चांगल्यासाठी बदलतं'.

'अचानक घडलेल्या घटनेनंतर तुमचे प्राधान्य (Priority) बदलते. आता मी माझ्या कुटुंब आणि तब्येतीला आणि कुटुंबाला प्राधान्य देतो. विशेषतः मी माझ्या मुलीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवतो. १४ डिसेंबरच्या त्या रात्रीनंतर आमच्यातील नाते पूर्णपणे बदलले आहे. आम्ही अजून जवळ आलो आहोत. हे तुम्हाला सर्वात जास्त आनंदित करते. आपण आपल्या कुटुंबाला गृहित धरतो त्यामुळे अनेकदा आनंदाचे क्षण मिस करतो आणि ते आपल्याला समजतदेखील नाही', असंही श्रेयसने सांगितले

याआधीही श्रेयस तळपदेने आपल्या तब्येतीबद्दल अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे. त्याच्या आजारपणात त्याला कुटुंबियांनी आणि चाहत्यांनी खूप साथ दिली आहे, त्यामुळे श्रेयसने त्यांचे आभार मानले होते.

श्रेयसच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, श्रेयस अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये झळकला आहे. श्रेयसने ओम शांती ओम, गोलमाल या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर माझी तुझी रेशीमगाठी अशा अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.

Edited By-Siddhi Hande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Rain: नाशिकच्या गंगापुर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला, अन् एक तरुण रामकुंडात अडकला, पाहा थरारक प्रसंग|VIDEO

Maharashtra Live News Update: सुरत शहराच्या उधना-नवसारी रोडवर पावसाचे पाणी साचले

Mahadev Munde Case : व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरण; पोलिसांनी नोंदविला बाळा बांगरचा जवाब, ६ तास कसून चौकशी

Electric Scooter: तीन लोकांसाठी योग्य आहे का इलेक्ट्रिक स्कूटर? जाणून घ्या स्कूटरची वजन क्षमता आणि परफॉर्मन्स

Kidney infection symptoms: किडनीमध्ये इनफेक्शन झाल्यानंतर शरीरात दिसतात 'ही लक्षणं; खराब होण्यापूर्वी डॉक्टरांना भेटा

SCROLL FOR NEXT