Kapkapiii Motion Poster: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूरच्या नव्या चित्रपटाचं पोस्टर रिलीज, 'कपकपी' पाहून प्रेक्षकांमध्ये होणार हास्यकल्लोळ

Shreyas Talpade And Tusshar Kapoor Movies: ‘गोलमाल’, ‘गोलमाल अगेन’ आणि ‘गोलमाल रिटर्न’ नंतर बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांची जोडी पुन्हा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत.
Kapkapiii Motion Poster Out
Kapkapiii Motion Poster OutInstagram

Kapkapiii Motion Poster Out

‘गोलमाल’, ‘गोलमाल अगेन’ आणि ‘गोलमाल रिटर्न’ नंतर बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांची जोडी पुन्हा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. नुकतंच श्रेयसच्या आणि तुषारच्या ‘कपकपी’ या हॉरर कॉमेडी चित्रपटाचा मोशन पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे.

सध्या श्रेयस तळपदे चांगलाच चर्चेत राहिलेला अभिनेता आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. आजारपणातून अभिनेता आता ठणठणीत बरा झाला असून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Kapkapiii Motion Poster Out
'Do Aur Do Pyaar'चा Teaser Out; विद्या- प्रतिकच्या मॉडर्न लव्हस्टोरीने वेधले लक्ष

अभिनेता श्रेयस तळपदेने नुकतंच ‘वेलकम टू द जंगल’ चित्रपटाच्या शूटिंगला कालपासून अर्थात २० मार्चपासून शूटिंगला सुरूवात केली आहे. अभिनेता तब्बल अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर आपल्या कामावर परतला आहे.

नुकतंच श्रेयसचा ‘ही अनोखी गाठ’ हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटानंतर अभिनेत्याचा ‘कपकपी’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. हॉरर कॉमेडी चित्रपटाच्या ह्या मोशन पोस्टरची जोरदार चर्चा होत आहे.

संगीत सिवन दिग्दर्शित आणि जयेश पटेल निर्मित 'कपकपी' लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या मोशन पोस्टरला काही धडकी भरवणाऱ्या दृश्यांसह कॉमेडी देखील पाहायला मिळत आहे. श्रेयस आणि तुषारसोबत आणखी स्टारकास्ट चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

श्रेयस तळपदे ‘कपकपी’ चित्रपटाबद्दल म्हणाला, "‘कपकपी’ हा एका वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे. प्रेक्षकांना थ्रिलर, भयानक कथा आणि देशभक्तीपर धाटणीचे चित्रपट पाहायला खूप आवडत आहेत. आम्ही एक हॉरर कॉमेडी चित्रपट घेऊन आलो आहेत. हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांना खळखळून हसवेल, यात काही शंका नाही."

संगीत शिवन दिग्दर्शित 'कपकपी' चित्रपटामध्ये, श्रेयस तळपदेसह तुषार कपूर, सिद्धी इंदानी, अभिषेक कुमार, जय ठक्कर हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अद्याप या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झालेली नाही. दरम्यान, श्रेयस तळपदे 'वेलकम टू द जंगल' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.

Kapkapiii Motion Poster Out
Earthquake Ss Rajamouli: भूकंपातून राजामौली थोडक्यात बचावले; मुलगा कार्तिकेयने पोस्ट करत सांगितला अंगावर शहारे आणणारा किस्सा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com