'Do Aur Do Pyaar'चा Teaser Out; विद्या- प्रतिकच्या मॉडर्न लव्हस्टोरीने वेधले लक्ष

Vidya Balan Starrer Do Aur Do Pyaar Movie Teaser Relaesed: विद्या बालन आणि प्रतीक गांधी यांच्या 'दो और दो प्यार' या आगामी चित्रपटाची गेल्या काही दिवसांपूर्वीच घोषणा करण्यात आली आहे. रॉम- कॉम असलेल्या ह्या चित्रपटाचा नुकताच टीझर प्रदर्शित झालेला आहे.
Do Aur Do Pyaar Movie Poster
Do Aur Do Pyaar Movie PosterSaam Tv

Do Aur Do Pyaar Teaser

विद्या बालन (Vidya Balan) आणि प्रतीक गांधी (Pratik Gandhi) यांच्या आगामी चित्रपटाची गेल्या काही दिवसांपूर्वीच घोषणा करण्यात आली आहे. रॉम- कॉम असलेल्या ह्या चित्रपटाचा नुकताच टीझर प्रदर्शित झालेला आहे. 'दो और दो प्यार' (Do Aur Do Pyaar Movie) असं चित्रपटाचं नाव आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा मोशन पोस्टर आणि पोस्टर प्रदर्शित झालं होतं. त्यानंतर आज चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे (Do Aur Do Pyaar Teaser Out). लव्ह आणि कॉमेडी असं कथानक असलेल्या या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा पाहायला मिळते. (Bollywood Film)

Do Aur Do Pyaar Movie Poster
Earthquake Ss Rajamouli: भूकंपातून राजामौली थोडक्यात बचावले; मुलगा कार्तिकेयने पोस्ट करत सांगितला अंगावर शहारे आणणारा किस्सा

शेअर केलेल्या टीझरमध्ये, विद्या बालनसोबत प्रतीक गांधी, इलियाना डिक्रूझ आणि सेंथिल राममूर्ती ही स्टारकास्टही दिसणार आहे. विद्या बालन आणि प्रतीक गांधी पती- पत्नी दिसत आहे. यांच्या ह्या लव्हस्टोरीची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा असते. तर त्यासोबतच, विद्या बालन सेंधिलच्या प्रेमात. तर इलियाना प्रतीक गांधीच्या प्रेमात पडलेली दिसत आहे. ह्या हटके लव्हस्टोरीची अर्थात मॉडर्न रिलेशनशिपची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.

विद्याचे चित्रपटात काव्या नावाचे पात्र असून ती पेशाने डेंटिस्ट आहे, तर प्रतीक गांधी चित्रपटात अनीची भूमिका साकारत आहे. सेंथिल राममूर्ती विक्रम तर इलियाना डिक्रूझ नोरा नावाचे पात्र साकारले आहे. अ‍ॅप्लॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत 'दो और दो प्यार', एक एलिपसिस एंटरटेनमेंट प्रोडक्शन, प्रेम, हशा आणि आधुनिक नातेसंबंधांची चमकदार कथा असणार आहे.

'दो और दो प्यार' हा चित्रपट निर्माता श्रीशा गुहा ठाकुरता यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट येत्या १९ एप्रिल २०२४ ला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपट २०१७ मध्ये रिलीज झालेल्या 'द लव्हर्स' या परदेशी चित्रपटाच्या कथेवर आधारित आहे. ज्यामध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर भाष्य करण्यात आले आहे. (Entertainment News)

Do Aur Do Pyaar Movie Poster
Nagraj Manjule Debut OTT: नागराज मंजुळे आता ओटीटी गाजवायला सज्ज; ‘मटका किंग’ वेबसीरीजचे पोस्टर रिलीज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com