Earthquake Ss Rajamouli: भूकंपातून राजामौली थोडक्यात बचावले; मुलगा कार्तिकेयने पोस्ट करत सांगितला अंगावर शहारे आणणारा किस्सा

Earthquake Japan: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक एस. एस. राजामौली आणि त्यांचा मुलगा एस. एस. कार्तिकेय हे जपानमधील भूकंपातून थोडक्यात बचावले आहेत. जपानमध्ये २१ मार्चला ५.३ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे सौम्य झटके जाणवले होते.
Earthquake Ss Rajamouli
Earthquake Ss RajamouliSaam Tv

Earthquake SS Rajamouli And SS Karthikeya

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक एस. एस. राजामौली आणि त्यांचा मुलगा एस. एस. कार्तिकेय हे जपानमधील भूकंपातून थोडक्यात बचावले आहेत. जपानमध्ये गुरुवारी अर्थात २१ मार्चला ५.३ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे सौम्य झटके जाणवले होते. राजामौली यांचा मुलगा एस. एस. कार्तिकेयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. सुदैवाने यामध्ये राजामौली व त्यांचा मुलगा हे दोघेही सुखरूप बचावले आहेत. (Tollywood)

Earthquake Ss Rajamouli
Nagraj Manjule Debut OTT: नागराज मंजुळे आता ओटीटी गाजवायला सज्ज; ‘मटका किंग’ वेबसीरीजचे पोस्टर रिलीज

राजामौलींचा मुलगा कार्तिकेयने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. यामध्ये त्याने त्याच्या स्मार्टवॉचमध्ये भूकंपाचा अलर्ट दाखवला गेला आणि त्यानंतर काही वेळातच ५.३ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे झटके जाणवू लागले. कार्तिकेयने सोशल मीडियावर स्मार्टवॉचमध्ये भूकंपाचा अलर्ट देत असलेला एक फोटो शेअर केलेला आहे. पोस्टमध्ये, कार्तिकेयने हे सुद्धा सांगितलं की, जेव्हा भूकंप आला त्यावेळी, RRR या चित्रपटाची संपूर्ण टीम इमारतीच्या २८ व्या मजल्यावर होती. पण त्यावेळी नागरिक न घाबरता, न डगमगता उभे राहिले होते. (Film Director)

कार्तिकेयने भूकंपाबद्दल एक्सवर एक पोस्ट शेअर केली. त्यामध्ये तो म्हणतो, "नुकतंच जपानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला. त्यावेळी RRR चित्रपटाची संपूर्ण टीम इमारतीच्या २८ व्या मजल्यावर होती.. जमीन हळू हळू हलायला लागली. हा भूकंप आहे, हे जाणवायला आम्हाला थोडा वेळ लागला. मी घाबरून ओरडणारच होतो. पण, आमच्या आजूबाजूला जे जपानी लोक होते त्यांना काहीच फरक पडत नव्हता. जसं काही पाऊस पडणार आहे, अशा त्यांची रिॲक्शन होती." (Social Media)

Earthquake Ss Rajamouli
Game Changer OTT Rights Sold: प्रदर्शनापूर्वी रामचरणच्या ‘गेम चेंजर’ने बॉक्स ऑफिसवरचा गेम पाटलटला, केली १०० कोटींची कमाई

एस.एस.राजामौली त्यांच्या फॅमिलीसोबत आणि RRR चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत जपानमध्ये होणाऱ्या स्क्रीनिंगमध्ये सहभागी झाले होते. दिग्दर्शक अनेक दिवसांपासून जपानमध्ये आपल्या फॅमिलीसोबत क्वालिटी टाइम घालवत आहे. एस.एस.राजामौली यांचा 'RRR' चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून जपानमधील बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड करताना दिसत आहे. (Films)

चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. अलीकडेच, एस. एस. राजामौली यांनी जपानमधील स्क्रिनिंग दरम्यानचे काही फोटो शेअर केले होते. जपानच्या हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी(२१ मार्च) जपानच्या पूर्व भागात ५.३ रिश्टर स्केलचे धक्के जाणवल्याची माहिती आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाही जपानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. (Entertainment News)

Earthquake Ss Rajamouli
Game Changer OTT Rights Sold: प्रदर्शनापूर्वी रामचरणच्या ‘गेम चेंजर’ने बॉक्स ऑफिसवरचा गेम पाटलटला, केली १०० कोटींची कमाई

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com