Game Changer OTT Rights Sold: प्रदर्शनापूर्वी रामचरणच्या ‘गेम चेंजर’ने बॉक्स ऑफिसवरचा गेम पाटलटला, केली १०० कोटींची कमाई

Ram Charan Film Game Changer Film: रामचरण लवकरच ‘गेम चेंजर’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अद्याप चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झालेली नाही, तोच चित्रपटाने १०० कोटींची कमाई केलेली आहे.
Game Changer OTT Rights Sold
Game Changer OTT Rights SoldSaam Tv

Game Changer OTT Rights Sold

दाक्षिणात्य अभिनेता रामचरण ‘RRR’ चित्रपटामुळे सर्वाधिक प्रकाशझोतात आला. चित्रपटातल्या अभिनेत्याने ‘नाटू नाटू’ गाण्यातील डान्समुळे रामचरणच्या चाहत्यांमध्ये वाढ झाली. रामचरण ‘गेम चेंजर’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अद्याप चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झालेली नाही. तोच चित्रपटाने १०० कोटींची कमाई केलेली आहे. (Tollywood)

Game Changer OTT Rights Sold
Yodha 6th Day Collection: 'योद्धा'चा पहिल्या आठवड्यातच कमाईचा वेग मंदावला, सहा दिवसांत किती केली कमाई?

पॉलिटिकल ॲक्शन थ्रिलर ‘गेम चेंजर’ चित्रपटाचे दिग्दर्शन एस. शंकर करत आहे. तेलुगू चित्रपटाची अद्याप रिलीज डेट जाहीर झालेली नाही. अनेकदा सोशल मीडियावर चित्रपटाच्या सेटवरील अनेक फोटो आणि व्हिडीओ जाहीर झाले होते. चित्रपटाने रिलीजच्या आधीच ओटीटी राईट्सच्या माध्यमातून कोट्यवधींची कमाई केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिग्दर्शकांनी चित्रपटाचे ओटीटी राईट्स विकले आहेत. (OTT)

मीडिया रिपोर्टनुसार, रामचरणच्या ‘गेम चेंजर’ चित्रपटाचे साऊथ व्हर्जनचे ओटीटी राईट्स १०५ कोटींना विकले आहेत. साऊथ व्हर्जनचे ओटीटी राईट्स ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ’ने (Amazon Prime Video) विकत घेतले आहेत. तर हिंदी व्हर्जनचे ओटीटी राईट्स ‘झी ५’ (Zee 5) विकत घेण्याची शक्यता आहे. मात्र, याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. चित्रपटाचे दिग्दर्शन एस. शंकर करत असून चित्रपटात रामचरणसह कियारा अडवाणी ही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. दिल राजू आणि शिरीष या चित्रपटाचा निर्माते आहेत. (Films)

Game Changer OTT Rights Sold
Bobby Deol: धोनीची बॉबी देओलकडे ‘तो’ व्हिडीओ डिलिट करण्याची विनंती, दोघांची चॅटिंग व्हायरल

चित्रपटाच्या निर्मितीसाठी निर्माते पाण्यासारखा पैसा खर्च करताना पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्मात्यांनी चित्रपटाच्या गाण्यांवर ४० ते ५० कोटी रुपये खर्च केले आहेत. इतकंच नाही तर, चित्रपटामध्ये ट्रेनचा एक ॲक्शन सीन आहे, जो सुमारे ७ मिनिटांचा असणार आहे. केवळ त्या सीन्ससाठी निर्मात्यांनी तब्बल किंमत ७० कोटी रुपये खर्च केल्याचे बोलले जात आहे.

चित्रपटाची निर्मिती २५० कोटी रुपयांमध्ये झाली आहे. राम चरणच्या ह्या मोस्ट अवेटेड चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, त्याची रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही. सप्टेंबरमध्ये हा चित्रपट रिलीज होण्याची शक्यता आहे. (Entertainment News)

Game Changer OTT Rights Sold
Rani Mukherjee Birthday: उंचीवरून अन् सावळ्या रंगावरून राणी मुखर्जी झालेली रिजेक्ट; 'या' चित्रपटामुळे मिळाली आयुष्याला कलाटणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com