Yodha 6th Day Collection: 'योद्धा'चा पहिल्या आठवड्यातच कमाईचा वेग मंदावला, सहा दिवसांत किती केली कमाई?

Yodha Box Office Collection: बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या 'योद्धा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशीच निराशाजनक ओपनिंग कमाई केली आहे. चित्रपट बॉक्स ऑफिसवर खास जादू करताना दिसत नाहीये.
Yodha Film 6th Day Box Office Collection
Yodha Film 6th Day Box Office CollectionSaam Tv

Yodha 6th Day Box Office Collection

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या (Shidharth Malhotra) 'योद्धा' चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. गेल्या आठवड्यामध्ये हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशीच निराशाजनक ओपनिंग कमाई केली आहे. चित्रपट बॉक्स ऑफिसवर खास जादू करताना दिसत नाहीये. बिग बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाची कमाईच्या आकड्यामध्ये घसरण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. (Bollywood)

Yodha Film 6th Day Box Office Collection
Bobby Deol: धोनीची बॉबी देओलकडे ‘तो’ व्हिडीओ डिलिट करण्याची विनंती, दोघांची चॅटिंग व्हायरल

सिद्धार्थ मल्होत्राच्या 'योद्धा' चित्रपटाला पहिल्याच आठवड्यामध्ये चांगली कमाई करणं देखील कठीण गेले. रिलीजच्या सहाव्या दिवशीही चित्रपट निर्मात्यांना मोठा धक्का बसला आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा प्रवास सुरुवातीलाच कठीण झाला आहे. 'योद्धा'चे प्रदर्शन बरेच दिवसांपासून पुढे ढकलले जात होते. चित्रपट गेल्या आठवड्यामध्ये अर्थात १५ मार्चला प्रदर्शित झाला आहे. प्रचंड बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी ४ कोटींची कमाई केली होती. (Bollywood Film)

या ॲक्शनपॅक्ड चित्रपटामध्ये, मुख्य भूमिकेत सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra), दिशा पाटनी (Disha Patani) आणि राशी खन्ना (Raashii Khanna) हे चेहरे आहेत. ‘शेरशाह’नंतर बॉलिवूड सिद्धार्थ मल्होत्रा पुन्हा एकदा देशभक्तीपर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

सॅकल्निक या ट्रेड ॲनालिस्टनुसार, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी ४.१० कोटी, दुसऱ्या दिवशी ५.७५ कोटी, तिसऱ्या दिवशी ७ कोटी, चौथ्या दिवशी २.१५ कोटींची कमाई, पाचव्या दिवशी २. २५ कोटी तर सहाव्या दिवशी चित्रपटाने फक्त २ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने एका आठवड्यामध्ये, जेमतेम २३. २५ कोटींची कमाई केलेली आहे. (Bollywood News)

Yodha Film 6th Day Box Office Collection
Rani Mukherjee Birthday: उंचीवरून अन् सावळ्या रंगावरून राणी मुखर्जी झालेली रिजेक्ट; 'या' चित्रपटामुळे मिळाली आयुष्याला कलाटणी

दरम्यान, 'योद्धा' चित्रपटाचे दिग्दर्शन सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा यांनी केले आहे. तर करण जोहरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार करण्यात आला आहे. 'योद्धा' या ॲक्शन ड्रामा चित्रपटात प्लेन हायजॅकची कथा दाखवण्यात आली आहे. (Entertainment News)

Yodha Film 6th Day Box Office Collection
Elvish Yadav Case: आलिशान कारपासून ते प्रॉपर्टीपर्यंत सर्वकाही कर्जावर घेतलं, एल्विशच्या वडिलांचा धक्कादायक खुलासा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com