Rani Mukherjee Birthday: उंचीवरून अन् सावळ्या रंगावरून राणी मुखर्जी झालेली रिजेक्ट; 'या' चित्रपटामुळे मिळाली आयुष्याला कलाटणी

Rani Mukherjee News: आपल्या उत्कृष्ट अभिनयाने, आवाजाने आणि आपल्या सौंदर्याने वर्षानुवर्षे चाहत्यांची मने जिंकणारी अभिनेत्री राणी मुखर्जी. आज अर्थात २१ मार्च रोजी राणी मुखर्जी आपला ४५ वा वाढदिवस साजरा करत आहे.
Rani Mukherjee Birthday
Rani Mukherjee BirthdaySaam Tv
Published On

Rani Mukherjee Birthday

आपल्या उत्कृष्ट अभिनयाने, आवाजाने आणि आपल्या सौंदर्याने वर्षानुवर्षे चाहत्यांची मने जिंकणारी अभिनेत्री राणी मुखर्जी. आज अर्थात २१ मार्च रोजी राणी मुखर्जी आपला ४५ वा वाढदिवस साजरा करत आहे. राणीने तिच्या सिने कारकिर्दीत एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत, पण असं असलं तरीही तिला अनेकदा नकाराचा सामना करावा लागला होता. आपल्यालाही बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले, असं तिने काही वेळा बोलूनही दाखवले आहे. राणीला बॉलिवूडमध्ये, उंची, आवाज आणि तिच्या स्किन टोनमुळे तिला कित्येक निर्मात्यांनी डावलले आहे. (Bollywood)

Rani Mukherjee Birthday
Elvish Yadav Case: आलिशान कारपासून ते प्रॉपर्टीपर्यंत सर्वकाही कर्जावर घेतलं, एल्विशच्या वडिलांचा धक्कादायक खुलासा

राणी मुखर्जीचा जन्म २१ मार्च १९७८ रोजी मुंबईत झाला. राणी मुखर्जीचे कुटुंबीय बॉलिवूडमधील प्रसिद्ध कुटुंबीयांपैकी एक ओळखले जाते. राणी एक उत्तम अभिनेत्री तर आहेच पण तिने ओरिया डान्सही शिकली आहे. राणीने आपल्या सिनेकारकिर्दित अनेक चित्रपटांमध्ये गाणेही गायले आहे. तिने पार्श्वगायिका म्हणून अनेक चित्रपटांमध्ये गाणे गायले आहेत. (Bollywood Actress)

राणीकडे ॲक्टिंग इंडस्ट्रीतला फॅमिली बॅकग्राऊंड असल्याने काम मिळणे सोपे होते, असे अनेकांना वाटते. राणीला आपल्या स्वत:च्या हिंमतीवर काम मिळवायचे होते. त्यामुळे तिने अनेकदा ऑडिशन दिली आहे. राणीला खरी प्रसिद्धी १९९८ पासून झाली. राणीचा पहिला चित्रपट 'बियेर फुल' (1996) हा बंगाली चित्रपट होता. राणीला तिचे वडिल राम मुखर्जी यांनी तिला 'बियेर फुल' नावाच्या चित्रपटासाठी कास्ट केले होते. त्यानंतर राणीचा 'राजा की आयेगी बरात' नावाचा चित्रपट आला आणि त्यातून ती लोकप्रिय झाली. (Bollywood Film)

Rani Mukherjee Birthday
Priyanka Chopra अयोध्यामध्ये, निक जोनास आणि मालतीसोबत घेतलं रामलल्लाचं दर्शन; VIDEO व्हायरल

राणीला देखील स्वत:च्या आवाजाचा, दिसण्याचा आणि रंगाचा कॉम्प्लेक्स होता. तिच्या मते अभिनेत्री होण्यासाठी श्रीदेवी आणि रेखा यांच्यासारखं व्यक्तिमत्व होणं गरजेचे आहे असे म्हणणे होते. राणीला तिच्या दिसण्यावरुन आणि आवाजावरुन खूप ट्रोल करण्यात आले होते. तिचा 'गुलाम' चित्रपट होता त्यात तिचा आवाज डब करण्यात आला होता. (Entertainment News)

Rani Mukherjee Birthday
Yodha Box Office Collection Day 5: 'योद्धा'चा कमाईचा वेग घसरला, आतापर्यंत किती केले कलेक्शन?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com