'बिग बॉस OTT 2' चा विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) सध्या अडचणीमध्ये आहे. एल्विश यादवला सापांच्या विषाची तस्करी केल्याप्रकरणी नोएडा पोलिसांनी (Noida Police) अटक केली आहे. नोएडा पोलिसांनी 17 मार्चला एल्विश यादवला अटक केली. कोर्टाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रेव्ह पार्टींमध्ये सापाच्या विषाची सोय करुन देण्यावरून एल्विश यादवचे नाव पुढे आले आहे. या प्रकरणात एल्विश यादवला मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर आता एल्विश यादवच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. एल्विशच्या वडिलांना अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
एल्विश यादवच्या व्लॉग्समध्ये दाखवलेल्या मर्सिडीज आणि पोर्शसारख्या महागड्या कार आणि हाय-प्रोफाइल कार्सबद्दलही पालकांनी खुलासे केले आहेत. 'आज तक'ला दिलेल्या मुलाखतीत एल्विशच्या वडिलांनी मोठा खुलासा केला. एल्विशकडे असणाऱ्या या आलिशान कार त्याच्या नसल्याचे त्यांनी सांगितले. एल्विशचे वडील रामावतार यादव यांनी सांगितले की, 'तो त्याच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये स्टंट दाखवण्यासाठी जुन्या कार भाड्याने घ्यायचा आणि त्यांना नवीन गाड्या म्हणत असे.'
एल्विशच्या वडिलांनी असा देखील खुलासा केला की, 'त्यांचा मुलगा व्हिडिओ शूटसाठी मित्रांकडून अनेकदा कार घेतो आणि त्या परत करण्यापूर्वी व्हिडिओ तयार करायचा.' एल्विश यादवकडे कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेची मालकी नाही. त्याच्याकडे कोणतीही जमीन किंवा अपार्टमेंट तसंच दुबईमध्ये त्याचे कोणतेही घर नसल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले.
एल्विश यादव फक्त युट्यूब चॅनेल आणि जॅकेटच्या ऑनलाइन विक्रीतून कमाई करत असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बिग बॉस फेम एल्विश यादवने याआधी सर्व आरोप फेटाळले होते. पण आता त्याने या पार्टींसाठी सापाच्या विषाची व्यवस्था केल्याचे मान्य केले आहे. नवीन अपडेटमध्ये एल्विशने त्याच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप स्वीकारले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.