मागच्या काही काळापासून हृदयविकाराचे आजार तरुणांमध्ये वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे तरुणांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
पालकांना सावधानतेचा इशारा देणारी बातमी बीडमधून आहे. आता 0 ते 18 वयोगटातील लहान मुलांमध्येही हृदयविकाराचे प्रमाण वाढत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बीडमध्ये 0 ते 18 वयोगतील तब्बल 88 मुलांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत 0 ते 18 वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी केली जात आहे. तपासणीअंतर्गत आतापर्यंत बीड जिल्ह्यात 2 लाख 49 हजार 24 मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 96 मुलांना हृदयविकार (Heart Attack) आढळला असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे.
आतापर्यंत बीड जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून 88 शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. त्याचबरोबर या तपासणी अंतर्गत आतापर्यंत हृदय शस्त्रक्रियेसोबतच इतर 400 पेक्षा अधिक शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या आहेत. या शस्त्रक्रिया व मुलांच्या आजाराचा सर्व खर्च केंद्र सरकारच्या माध्यमातून केला जात आहे. दरम्यान यामुळं आता पालकांनी (Parents) आपल्या पाल्याच्या आरोग्याविषयी (Health) सावधान राहून काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
1. मुलांमध्ये हृदयविकाराचा झटका का येतो?
शाळेची लवकर उठण्याची वेळ आणि झोप पूर्ण न होणे यामुळे हृदयावर परिणाम होताना दिसत आहे.
खेळण्याच्या वेळेत मोबाईल फोनचा अतिवापर, तसेच शारीरिक हालचाल कमी होणे.
मुलांना खेळण्यासाठी न पाठवणे, अभ्यासाचा दबाव आणि मानसिक संतुलन बिघडणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागेल.
लहान वयातच रक्तदाब, शुगर, कोलेस्टेरॉल यांसारखे आजार मुलांमध्ये दिसून येतात.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.