Heart Attack Reason : तरुणांमध्ये वाढतेय हार्ट अटॅकचे प्रमाण, या सवयी आजपासून बदलाच

Heart Attack : मागच्या वर्षभरात हृदयविकारच्या अनेक समस्या समोर आल्या आहेत. त्यामुळे तरुणांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळाले आहे. भारतात १२ ते४५ वर्ष वयोगटातील लोकांना हृदयविकाराच्या झटक्याने जीव गमवावा लागला आहे.
Heart Attack Reason
Heart Attack ReasonSaam TV
Published On

Heart Attack Symptoms :

मागच्या वर्षभरात हृदयविकारच्या अनेक समस्या समोर आल्या आहेत. त्यामुळे तरुणांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळाले आहे. भारतात १२ ते४५ वर्ष वयोगटातील लोकांना हृदयविकाराच्या झटक्याने जीव गमवावा लागला आहे.

सध्या हृदयरोग हा जागतिक स्तरावर एक गंभीर आरोग्य समस्या निर्माण झाली आहे. बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, ताण यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. हा झटका येण्यापूर्वी शरीर आपल्याला काही संकेत देतात.

1. हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाणात का वाढते आहे?

लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत हृदयविकाराची (Heart Attack) अनेक प्रकरणे मिळाली आहेत. कोविड-१९ मुळे लोकांच्या जीवनशैलीवर वाईट परिणाम झाला असे डॉक्टरांचा म्हणणे आहे. शारीरिक हालचालींचा अभाव, ताणतणाव (Stress), नैराश्य आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीही लोकांमध्ये वाढल्या आहेत. २०२३ च्या आकडेवारीनुसार केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये कोरोना महामारीनंतर हृदयविकाराच्या अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.

Heart Attack Reason
Parenting Tips : मुलं सतत रागराग-चिडचिड करतात? पालकांनो, या टिप्स फॉलो करा; मूड राहिल नेहमी आनंदी

2. कारण काय?

गेल्या तीन वर्षात हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या मृत्यूंमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. याचा कोरोनाशी संबंध आहे असे डॉक्टरांनी मत मांडले आहे. NCRB ने दिलेल्या माहितीनुसार केवळ २०२२ मध्ये हृदयविकाराच्या घटनांमध्ये 12.5 टक्के लक्षणीय वाढ झाली आहे.

3. आहारात करा बदल

डॉक्टारांच्या मते प्री- डायबेटिस (Diabetes), प्री- हायपरटेन्शन, उच्च कोलेस्टेरॉल यासारख्या समस्या टाळता येतात. परंतु कोरोनामुळे आपण अधिक काळ घरात एकाच जागी बसून राहातो. त्यामुळे शरीराची पुरेशी हालचाल होत नाही. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक असते.

Heart Attack Reason
Winter Care Tips : हिवाळ्यात सर्दी-खोकल्यामुळे होऊ शकतो न्यूमोनिया, या आजारात कोणते पदार्थ खायला हवे? जाणून घ्या

चुकीचे खाणे-पिणे, जीवनशैली आणि शारीरिक हालचालीची कमतरता हे सगळ्यात महत्त्वाचे कारण हृदयविकाराच्या झटक्याचे आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आनुवंशिकता. शरीरात जेव्हा उच्च कोलेस्टेरॉल, साखरेची पातळी वाढणे, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, धुम्रपान, तणाव आणि जीवनशैली यामुळे हृदयविकाराचा त्रास होतो.

4. हृदयरोग टाळण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

  • मद्यपान आणि धुम्रपान टाळा.

  • आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा.

  • प्लांट बेस्ड पदार्थ खा.

  • नियमित व्यायाम करा ज्यामुळे शरीराची पुरेशी हालचाल होईल.

  • कोलेस्टेरॉल, मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास असलेल्या रुग्णांनी नियमित तपासणी करुन घ्यावी.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com