Winter Care Tips : हिवाळ्यात सर्दी-खोकल्यामुळे होऊ शकतो न्यूमोनिया, या आजारात कोणते पदार्थ खायला हवे? जाणून घ्या

Pneumonia Symptoms : हिवाळ्यात अनेकदा न्यूमोनिया होतो आणि याचा सामना वेळोवेळी करावा लागतो. शरीरातील तापमान कमी झाल्यावर याची लक्षणे अधिक वाढू लागतात. बरेचदा हा आजार अधिक गंभीर होत जातो.
Winter Care Tips
Winter Care Tips Saam Tv
Published On

Pneumonia Diet :

हिवाळा म्हटलं की, अनेक संसर्गजन्य आजार डोकं वर काढतात. सध्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने देशात पुन्हा एन्ट्री केली आहे. त्यात लहान मुलांमध्ये वेगाने पसरणारा न्यूमोनिया देखील एक आहे.

हिवाळ्यात अनेकदा न्यूमोनिया होतो आणि याचा सामना वेळोवेळी करावा लागतो. शरीरातील तापमान कमी झाल्यावर याची लक्षणे (Symptoms) अधिक वाढू लागतात. बरेचदा हा आजार (Disease) अधिक गंभीर होत जातो. अशावेळी लहान मुलांचा आहार (Diet) कसा ठेवायला हवा. न्यूमोनियामध्ये काय खावे आणि काय खाऊ नये जाणून घेऊया.

1. न्यूमोनियामध्ये काय खावे?

  • न्यूमोनिया झाला असेल तर छातीत कफ होणार नाही असे पदार्थ खा.

  • तांदूळ, ओट्स आणि बार्ली यांसारख्या पदार्थांचा समावेश करा. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल.

  • हिरव्या पालेभाज्यांमध्ये अँटिऑक्सिडंट असतात जे न्यूमोनिया सारख्या श्वसन संक्रमणास बरे करण्यास मदत करते.

  • आहारात नट, बीन्स, बिया, चिकन आणि सॅल्मनसारखे मासे जे फुफ्फुसाच्या ऊतींना बदलण्यास मदत करतात.

  • दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात जे आतड्यांमधील चांगल्या जीवाणूंना प्रोत्साहन देते. ज्यामुळे न्यूमोनियाच्या आजारामध्ये फायदेशीर ठरते.

  • हायड्रेट राहाण्यासाठी पाणी भरपूर प्या. ज्यामुळे छातीत जमा झालेला कफ निघण्यास मदत होते.

Winter Care Tips
Frequent Urination In Men : पुरुषांनो, वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर सतत लघवीला येते? मधुमेहाचे लक्षण नाहीच, असू शकतो हा गंभीर आजार

2. न्यूमोनियामध्ये हे पदार्थ चुकूनही खाऊ नका

  • न्यूमोनियाच्या आजारात स्टार्च असलेले पदार्थ खाणे टाळावे. यामुळे छातीत कफ तयार होतो. तसेच रक्तसंचय वाढतो.

  • दूध आणि गोड पदार्थामुळे फुफ्फुसात कफ तयार होतो.

  • कोल्ड ड्रिंक्समध्ये केवळ साखरच नाही तर सोडियम देखील असते. ज्यामुळे न्यूमोनियाचा धोका वाढतो.

  • कॅन केलेले किंवा सोडियमयुक्त पदार्थ खाल्ल्याने न्यूमोनियाची लक्षणे वाढू शकतात.

  • याशिवाय दारुचे सेवन करणे टाळावे. अल्कोहोलमध्ये सल्फाइट्स असतात. ज्यामुळे न्यूमोनियाचा त्रास अधिक वाढतो. इथेनॉल, बिअर, वाइनमध्ये आढळणारे घटक फुफ्फुसाच्या पेशींवर परिणाम करतात. ज्यामुळे न्यूमोनियाची लक्षणे वाढू शकतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com