Frequent Urination In Men : पुरुषांनो, वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर सतत लघवीला येते? मधुमेहाचे लक्षण नाहीच, असू शकतो हा गंभीर आजार

What causes frequent urination in men : कामाच्या गडबडीत अनेकदा पुरुषांना लघवीला जाण्याची गरज भासते परंतु, ते याकडे दुर्लक्ष करतात. याला मधुमेहाचा आजार समजतात. त्यानंतर मधुमेहाची तपासणी केल्याने साखरेची पातळी वाढलीले नसते. मग असे का होते? याचे कारण काय?
Frequent Urination In Men
Frequent Urination In MenSaam Tv
Published On

Frequent Urination Is A Common Diabetes Symptom :

मधुमेह हा झपाट्याने वाढणारा गंभीर आजार आहे. सध्या या आजारांने अनेक तरुणपिढी ग्रस्त आहे. मधुमेहावर अद्याप कोणताही इलाज नाही. बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी आणि वाढत्या ताणामुळे मधुमेहाचा धोका अधिक प्रमाणात वाढता दिसून येत आहे.

कामाच्या गडबडीत अनेकदा पुरुषांना लघवीला जाण्याची गरज भासते परंतु, ते याकडे दुर्लक्ष करतात. याला मधुमेहाचा (Diabetes) आजार (Disease) समजतात. त्यानंतर मधुमेहाची तपासणी केल्याने साखरेची पातळी वाढलीले नसते. मग असे का होते? याचे कारण काय?

तज्ज्ञांच्या मते, वारंवार लघवी होणे हे पुरुषांमध्ये सामान्य वाटत असले तरी ही गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरमुळे (Cancer) दिवसातून अनेक वेळा लघवीची समस्या उद्भवू शकते. त्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते.

Frequent Urination In Men
Diabetes रुग्णांनो 2024 च्या सुरुवातीला लाइफस्टाइलमध्ये करा हे बदल, राहाल फिट

तज्ज्ञ म्हणतात की, वारंवार लघवी येण्याची समस्या ही फक्त मधुमेहाची नाही. द लॅन्सेट या वैद्यकीय जर्नलने केलेल्या संशोधनातून असे दिसून आले की, वारंवार लघवीला येणे हे प्रोस्टेट कॅन्सरचे लक्षण असू शकते. यासाठी त्यांनी दोन हजार रुग्णांवर संशोधन केले आहे. त्यामुळे जर वारंवार लघवी होत असेल आणि मधुमेह किंवा UTI ची समस्या नसेल तर त्या व्यक्तीने PFA चाचणी देखील करुन घ्यावी. त्यावरुन आपल्याला कळेल प्रोस्टेट कर्करोग आहे की, नाही.

1. प्रोस्टेट कर्करोगाची लक्षणे

प्रोस्टेट कर्करोग हा पुरुषांमध्ये वाढत्या वयानुसार होणारा आजार आहे. वृद्ध पुरुषांना प्रोस्टेट कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते. या आजाराची लक्षणे सामान्य वाटत असली तरी लघवी करण्यास त्रास होणे, वारंवार किंवा तातडीने लघवी करण्याची गरज भासणे आणि मूत्रातू रक्त येणे.

Frequent Urination In Men
Health Benefits : हाडांचे आरोग्य आणि पचन संस्थेसाठी बहुगुणी आहे तीळ-गूळ, इतर फायदेही वाचा

ही लक्षणे प्रोस्टेट कॅन्सर वाढची असतात. त्यामुळे वाढत्या वयाबरोबर या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका. वेळोवेळी नियमित तपासणी करून घेणेही गरजेचे आहे. कॅन्सरची लक्षणे ही सामान्यत: कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्यात आढळतात. त्यामुळे मृत्यूचा धोका वाढतो. जर वयाची चाळेशी ओलांडली असेल तर तुम्हाला वारंवार लघवीची तक्रार होत असेल तर या आजाराकडे दुर्लक्ष करु नका.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com