Malaika Arora: कुठे गेली आई-मुलाच्या नात्याची प्रतिष्ठा?, अरहानला व्हर्जिनिटीबद्दल प्रश्न विचारल्याने मलायका अरोरा झाली ट्रोल

Malaika Arora Trolled: मलायका अरारो तिचा २१ वर्षीय मुलगा अरहान खानच्या पॉडकास्ट 'डंब बिर्याणी' मध्ये दिसली. अरहानचे हे पॉडकास्ट गेल्या काही दिवसांपासून लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. या पॉडकास्टमध्ये अभिनेत्रीने तिच्या मुलाला असा प्रश्न विचारला जे ऐकून नेटकरी चांगलेच संतापलेत.
Malaika Arora
Malaika AroraSaam Tv

बॉलिवूडची (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आपल्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल लाइफमुळे देखील चर्चेत असते. नुकताच मलायका अरारो तिचा २१ वर्षीय मुलगा अरहान खानच्या पॉडकास्ट 'डंब बिर्याणी' मध्ये दिसली. अरहानचे हे पॉडकास्ट गेल्या काही दिवसांपासून लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. या पॉडकास्टमध्ये अभिनेत्रीने तिच्या मुलाला असा प्रश्न विचारला जे ऐकून नेटकरी चांगलेच संतापलेत. नेटकऱ्यांनी मलायकाला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अरहानच्या डंब बिर्याणी या पॉडकास्टमध्ये मलायकाने हजेरी लावली. यावेळी मलायका आणि अरहान एका गेममध्ये गुंतले होते. या गेममध्ये त्यांनी एकमेकांना अनेक प्रश्न विचारले आणि जर ते उत्तर देऊ शकले नाहीत तर त्यांना 'मिर्ची का सालन'चा शॉट घेतला किंवा हिरवी मिरची खायची होती. यादरम्यान मलायकाने तिच्या 22 वर्षांच्या मुलाला त्याच्या बॉडी काउंटबद्दल विचारले. म्हणजे तिने अरहानला त्याच्या सेक्स लाइफबद्दल प्रश्न विचारला.

मलायका पुढे म्हणाली की, 'मला प्रामाणिकपणे उत्तर दे... फक्त मला उत्तर दे... मला एक नंबर हवा आहे.' आश्चर्यचकित झालेल्या अरहानने प्रश्नाचे उत्तर न देण्याचा निर्णय घेतला आणि त्याऐवजी 'मिर्ची का सालन' शॉट घेतला. आता अभिनेत्रीच्या या प्रश्नाने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. एका यूजरने लिहिले की, 'अखेर संस्कार कुठे गेले? असे प्रश्न ती आपल्या मुलाला कसे विचारू शकते? दुसऱ्या यूजरने लिहिले, 'हे कसले पॉडकास्ट आहे. कुठे गेली आई-मुलाच्या नात्याची प्रतिष्ठा? तिसऱ्या युजरने लिहिले की, 'हे सर्व पाहून माझे मन चुकले आहे.'

Malaika Arora
Nach Ga Ghuma: 'नाच गं घुमा'च्या टायटल साँगवर प्रसाद ओकने मंजिरी आणि अमृतासोबत केली जबरदस्त रील, पाहून तुम्हीही कराल कौतुक

याच एपिसोडदरम्यान अरहानने मलायकाला तिच्या लग्नाच्या प्लॅनिंगबद्दल विचारले. त्याने मलायकाला विचारले, 'मला एक योग्य तारीख, एक ठिकाण, एक डेस्टिनेशन आणि कधी. मला या सर्व प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. मलायकाने या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. उत्तर टाळत मलायकाने हिरवी मिरची खाण्याचा निर्णय घेतला. तिने सांगितले की, 'मी सध्या सर्वोत्तम जीवन जगत आहे.'

Malaika Arora
Mrunmayee Deshpande Video: सासुरवाशीण गौतमीला जळवण्यासाठी मृण्मयीने शेअर केला व्हिडिओ; म्हणाली, टुक टुक गौतू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com