Mrunmayee Deshpande Video: सासुरवाशीण गौतमीला जळवण्यासाठी मृण्मयीने शेअर केला व्हिडिओ; म्हणाली, टुक टुक गौतू

Mrunmayee Deshpande Share Video: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून मृण्मयी देशपांडेला ओळखले जाते. मृण्मयी नेहमी बहिण गौतमीसोबतचे व्हिडिओ शेअर करत असते. अनेकदा व्हिडिओमध्ये मृण्मयी गौतमीला त्रास देताना दिसत असते.
Mrunmayee Deshpande Video
Mrunmayee Deshpande VideoSaam Tv

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून मृण्मयी देशपांडेला ओळखले जाते. मृण्मयी नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. मृण्मयी नेहमी बहिण गौतमीसोबतचे व्हिडिओ शेअर करत असते. अनेकदा व्हिडिओमध्ये मृण्मयी गौतमीला त्रास देताना दिसत असते. बहिणींमधील ही केमिस्ट्री चाहत्यांना मात्र नेहमीच आवडत असते. मृण्मयीने पुन्हा एकदा एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

मृण्मयी व्हिडिओमध्ये म्हणतेय की, 'खूप जास्त दमल्यावर, खूप काम केल्यावर, प्रमोशन्ससाठी मुंबई पुणे, मुंबई कोल्हापूर, सांगली अशा अनेक ठिकाणी फिरल्यानंतर सर्वात जास्त कुठल्या गोष्टीची गरज असते तर तो हा उपाय'. असं म्हणते. यानंतर मृ्ण्मयीची आई तिला केसांना तेल लावताना दिसत आहे. या व्हिडिओला मृण्मयीने 'लाड = आई = लाड, टूक टूक गौतू', असं कॅप्शन दिले आहे.

व्हिडिओमध्ये मृण्मयी मात्र आईकडून डोक्याला तेल लावून घेताना खूपच आनंदी दिसत आहे. या व्हिडिओवर गौतमीला टॅग करत तिला जळवण्याचा प्रयत्न करत आहे. मृण्मयीच्या या व्हिडिओवर गौतमीने कमेंट केली आहे. गौतमीने नाक मुरडल्याचा इमोजी टाकत आपली नाराजी व्यक्त केली आहे. परंतु बहिणींच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Mrunmayee Deshpande Video
Nach ga Ghuma: 'नाच गं घुमा'च्या टायटल साँगवर प्रसाद ओकने मंजिरी आणि अमृतासोबत केली जबरदस्त रील, पाहून तुम्हीही कराल कौतुक

मृण्मयीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, मृण्मयी लवकरच 'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटात ती ललिताबाई फडके यांची भूमिका साकरणार आहे.

Edited By-Siddhi Hande

Mrunmayee Deshpande Video
Saleel Kulkarni Post: ''आमच्या शुभूने..." लेकाचं पहिलं हिंदी गाणं येत असल्याने सलील कुलकर्णींची खास पोस्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com