Saleel Kulkarni Post: ''आमच्या शुभूने..." लेकाचं पहिलं हिंदी गाणं येत असल्याने सलील कुलकर्णींची खास पोस्ट

Saleel Kulkarni News: सलील कुलकर्णी यांनी मुलगा शुभंकर कुलकर्णीचे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी मुलाचे खूप कौतुक केले आहे.
Saleel Kulkarni Post
Saleel Kulkarni PostSaam Tv

Saleel Kulkarni News: गायक, संगीतकार आणि कवी अशा अनेक भूमिकार पार पाडणारे सलील कुलकर्णी नेहमीच चर्चेत असतात. सलील कुलकर्णींची अनेक गाणी प्रेक्षकांना खूप आवडतात. त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत आता मुलगा शुभंकरने देखील गायक म्हणून इंडस्ट्रीत पाऊल ठेवले आहे. शुभंकरने पहिलं हिंदी गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यासाठीच सलील कुलकर्णी यांनी लेकासाठी एक खास पोस्ट केली आहे.

सलील कुलकर्णी यांनी मुलगा शुभंकर कुलकर्णीचे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी मुलाचे खूप कौतुक केले आहे.

सलील कुलकर्णींनी शुभंकरसोबतचा लहानपणीचा फोटो शेअर करत शुभूच्या बाबाची पोस्ट - ही पोस्ट संगीतकार सलील कुलकर्णीची नाही .. शुभंकर च्या बाबाची आहे .. आमच्या शुभूने अगदी २ वर्षाचा असतांना .. अग्गोबाई ढग्गोबाई गायलं होतं ..मग एकटी एकटी घाबरलीस ना .. या गाण्यावर तुम्ही भरभरून प्रेम केलं ..मग त्याने अनेक गाणी गायली ..”चिंटू” चित्रपटापासून ते “एकदा काय झालं” मधल्या “ श्याम आणि राम “ पर्यंत. मग काही महत्वाचे पुरस्कार त्याला मिळाले ..

देशात परदेशात कार्यक्रम केले आणि तुम्ही त्याचं कौतुक सुद्धा केलं .. थोरामोठ्यांनी पण केलं … अगदी मागच्या महिन्यात ध्वनिमुद्रित केलेल्या “ श्रीरामस्तुती “ साठी तुम्ही कौतुकाचा वर्षाव केला ..आता एक तरुण गायक म्हणून त्याचं पहिलं हिंदी गाणं येतंय. स्वानंद किरकिरेने लिहिलं आहे .. अप्रतिम शब्द आहेत.. आणि सलील कुलकर्णीचे संगीत आहे. .“ एक बात कहु ? ….तुम जाओ मत ..रहो .तुमचा आशीर्वाद हवा आहे .., असं कॅप्शन दिले आहे.

Saleel Kulkarni Post
Premachi Goshta: सागर मुक्ताला निर्दोष सिद्ध करणार का?; 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत नवा ट्विस्ट

शुभंकरचे नवीन गाणं येत असल्याने वडील सलील कुलकर्णींना खूप आनंद झाला असल्याचे पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे. शुभंकर हा गायक आहे. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक गाण्यांचे व्हिडिओ शेअर करत असतो. तसेच तो गाण्यांचे अनेक कार्यक्रम करतो. शुभंकरची गाणी चाहत्यांना खूप जास्त आवडतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com