Premachi Goshta: सागर मुक्ताला निर्दोष सिद्ध करणार का?; 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत नवा ट्विस्ट

Premachi Goshta Serial Promo: स्टार प्रवाह वाहिनीवरील 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका अल्पावधीतच प्रसिद्ध झाली आहे. मालिकेच्या कथानकातदेखील अनेक बदल होताना दिसत आहे. मालिकेत आता एक ट्विस्ट येणार आहे. मालिकेचा नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
Premachi Goshta Serial Promo
Premachi Goshta Serial Latest UpdateInstagram

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका अल्पावधीतच प्रसिद्ध झाली आहे. मालिका नेहमी टीआरपीमध्ये अव्वल असते. मालिकेच्या कथानकातदेखील अनेक बदल होताना दिसत आहे. त्यामुळेच प्रेक्षकांना मालिका खूप जास्त आवडत आहे. मालिकेत सध्या एक नवीन ट्रॅक सुरु झाला आहे.

प्रेमाची गोष्ट मालिकेचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. नवीन प्रोमोमध्ये, तेजश्री प्रधान म्हणजेच मुक्ता कार्तिकवर आरोप करत आहे. 'कार्तिकने तिच्या अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला', असे मुक्ता सांगते. त्यावर कार्तिक स्वतः ला वाचवण्यासाठी 'मुक्ता वहिनीच माझ्या जवळ आल्या होत्या', असं खोटं सांगतो. यानंतर मु्क्ताची सासू तिला ओरडते आणि 'चालती हो माझ्या घरातून.' असे म्हणून तिला जाण्यास सांगते. तेवढ्यात मुक्ताची आई माधवी तिथे येते आणि मुक्ताला त्यांच्या घरी घेऊन जाते. यानंतर सागर म्हणतो की, 'मुक्ता मी तुम्हाला लवकरच निर्दोष सिद्ध करणारच'.

Premachi Goshta Serial Promo
Vidya Balan: मला शाहरुखसोबत रोमँटिक चित्रपट करायचा आहे; विद्या बालनने बोलून दाखवली मनातील इच्छा

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आता नवीन वळण आले आहे. मुक्ता- सागरमधील दुरावा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आता कार्तिकचा खोटेपणा मुक्तासमोर आला आहे. परंतु मुक्ता त्याचा हा खोटा चेहरा कुटुंबियांसमोर उघड करण्यास असमर्थ ठरताना दिसत आहे. त्यामुळे आता सागर तरी मुक्तावर विश्वास ठेवणार का? कोळी कुटुंबियांसमोर कार्तिकचा खरा चेहरा उघड होणार का? सागर मुक्ताला निर्दोष सिद्ध करण्यासाठी काय प्रयत्न करणार? यादरम्यान मुक्ता आणि सागरमधील दुरावा कमी होणार का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले आहे.

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील नवीन वळणामुळे प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. मालिकेतील सागर- मुक्ताची केमिस्ट्री पाहण्याचे चाहते मात्र उत्सुक असल्याचे दिसत आहे.

Edited By-Siddhi Hande

Premachi Goshta Serial Promo
Deepika Padukone: दीपिका ४ महिन्यांची गरोदर, तरीही करतेय 'सिंघम अगेन'चं शुटिंग; फोटो व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com