Gulabi Saree Reels: संजू राठोडच्या ‘गुलाबी साडी’ची परदेशी सोशल मीडिया इन्फ्लूएंसर्सलाही भुरळ, चाहत्यांकडून होतंय कौतुक

Ricky Pond And Kili Paul Shared Gulabi Sadi Song Reel: सध्या इन्स्टाग्रामवर ‘गुलाबी साडी’ या गाण्याची जोरदार चर्चा होत आहे. अनेक सेलिब्रिटींपासून सोशल मीडिया काँटेंट किएटर्सने या गाण्यावर रिल्स बनवल्या आहे.
Ricky Pond And Kili Paul Shared Gulabi Sadi Song Reel
Ricky Pond And Kili Paul Shared Gulabi Sadi Song ReelSaam Tv

Sanju Rathore Gulabi Saree Reels

सोशल मीडियावर कायमच अनेक गाणे चर्चेत असतात. इन्स्टाग्रामवर चाहत्यांकडून अनेक गाण्यांवर रील बनवली जाते. नेटकऱ्यांची क्रिएटिव्हिटी नेहमीच चर्चेचा विषय असते. अशातच सध्या इन्स्टाग्रामवर ‘गुलाबी साडी’ या गाण्याची जोरदार चर्चा होत आहे. अनेक सेलिब्रिटींपासून सोशल मीडिया काँटेंट किएटर्सने या गाण्यावर रिल्स बनवल्या आहे. अशातच दोन सोशल मीडिया काँटेंट किएटर्सलाही गाण्याची भुरळ पडली आहे. (Song)

Ricky Pond And Kili Paul Shared Gulabi Sadi Song Reel
Elvish Yadav : यूट्युबर एल्विश यादवला पोलिसांकडून अटक; काय आहे नेमकं प्रकरण?

नेहमीच आपल्या डान्स स्टेप्स आणि हटक्या क्रिएटिव्हिटीमुळे चर्चेत राहणारे कीली पॉलने आणि रिकी पाँडने या गाण्यावर रिल बनवला आहे. नुकतंच या दोघांनीही रिल शेअर केलेला असून दोघांच्या ही डान्सचे नेटकऱ्यांकडून होत आहे. दोघांचाही मराठी गाण्यावर डान्स करणे ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी ही त्यांनी अनेकदा मराठी ट्रेंडिंग गाण्यावर रिल बनवत डान्स केला आहे. (Social Media)

व्हिडीओमध्ये या दोघांनीही गाण्यामध्ये केलेल्या हूक स्टेप्स प्रमाणेच डान्स स्टेप्स केलेल्या आहेत. सध्या दोघांच्याही डान्सचे कौतुक होत असून त्यांच्या रिलवर चाहत्यांकडून लाईक्स वर्षाव होत आहे. रिकी पाँडच्या रिलवर ३ लाखांहून अधिक चाहत्यांनी लाईक्स केली आहे. तर हजारो चाहत्यांनी कमेंट्स केली आहे. तर किली पॉलच्या रिलवर ६ लाखांहून अधिक चाहत्यांनी लाईक्स केली आहे. दोघांच्याही डान्सचे सध्या इन्स्टाग्रामवर कौतुक होत आहे. (Viral Video)

Ricky Pond And Kili Paul Shared Gulabi Sadi Song Reel
Chala Hawa Yeu Dya: 'चला हवा येऊ द्या'च्या प्रेक्षकांनो निराश होऊ नका, ब्रेकनंतर शो नव्या जोमात परत येणार; चॅनेलने दिली मोठी अपडेट

संजू राठोडने गायलेले ‘गुलाबी साडी’ हे गाणं एका महिन्यापूर्वीच रिलीज झालं होतं. या गाण्यामध्ये प्रमुख भूमिकेत संजू राठोड आणि प्राजक्ता हे दोघेही आहेत. या संजू राठोडने या गाण्याला आवाज दिला असून त्याने हे गाणं लिहिलंही आहे. सध्या हे गाणं इन्स्टाग्रामवर कमालीचं चर्चेत आलं असून अनेकांनी या गाण्यावर रिल्स बनवले आहे. (Entertainment News)

Ricky Pond And Kili Paul Shared Gulabi Sadi Song Reel
Nandesh Umap: लग्नाच्या 25 व्या वाढदिवशी पुन्हा विवाहबंधनात अडकले नंदेश उमप, पत्नीसोबतचे फोटो शेअर करत म्हणाले...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com