Elvish Yadav : बिगबॉस ओटीटी विजेता एल्विश यादवला पोलिसांकडून अटक; काय आहे नेमकं प्रकरण?

Elvish Yadav Arrested by Police : एल्विश यादवबाबत मोठं वृत्त हाती आलं आहे. युट्यूबर एल्विश यादवला नोएडा पोलिसांनी अटक केली. सापांच्या विषाच्या तस्करी प्रकरणात एल्विशला अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
Elvish Yadav
Elvish Yadav Saam TV
Published On

Elvish Yadav Latest News :

एल्विश यादवबाबत मोठं वृत्त हाती आलं आहे. युट्यूबर एल्विश यादवला नोएडा पोलिसांनी अटक केली. सापांच्या विषाच्या तस्करी प्रकरणात एल्विशला अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी एल्विश यादवची चौकशी सुरु आहे. काही दिवसांपूर्वी या प्रकरणात पोलिसांनी ५ जणांना अटक केली होती. (Latest Marathi News)

एल्विश यादवच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सापांच्या विषाच्या तस्करीच्या कथित प्रकरणात नोएडा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. युट्यूबर एल्विश यादववर रेवपार्टीमध्ये सापांच्या विषाचा वापर केल्याचा मोठा आरोप त्याच्यावर आहे.

Elvish Yadav
Orry Entered To Bigg Boss 17: आता जाळ अन् धुर संगटच... ‘बिग बॉस १७’ मध्ये ओरी येणार?, ‘वीकेंड का वार’ मध्ये होणार धमाका!

काय आहे प्रकरण?

8 नोव्हेंबरला नोएडा पोलिसांनी रेव पार्टीमध्ये सापाच्या विषाचा वापर केल्याप्रकरणी एफआयर नोंद करण्यात आला होता. याच प्रकरणातील आरोपींमध्ये एल्विशच्याही नावाचा सामावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. यामध्ये राहुल, टीटूनाथ, जयकरन, नारायण आणि रविनाथ यांच्या नावाचा सामावेश आहे. पोलिसांना राहुल नावाच्या तरुणाकडे २० एमएल सापाचं विष आढळलं होतं.

Elvish Yadav
Priyanka Chopra Don 3 Entered: ‘जंगली बिल्ली’ पुन्हा ‘डॉन’चा पाठलाग करणार; रणवीर सिंगसोबत ‘डॉन ३’मध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लची एन्ट्री?

एल्विशने काय स्पष्टीकरण दिलं होतं?

सदर प्रकरण समोर आल्यानंतर एल्विश यादवने इन्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत स्पष्टीकरण दिलं होतं. एल्विशने म्हटलं की, 'मी सकाळी उठलो. तर वृत्त वाहिन्यांवर माझं नाव सापांच्या विषाच्या तस्करी प्रकरणात आलं. माझ्या विरोधातील वृत्त खोटं आहे. माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही.

'माझ्या विषयीच्या वृत्तामध्ये कोणतीही सत्यता नाही. या प्रकरणातून माझी बदनामी करू नका. मी उत्तर प्रदेश पोलिसांनी सहकार्य करण्यास तयार आहे. मी उत्तर प्रदेश आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आवाहन करत आहे की, या प्रकरणी १ टक्के जरी आरोप खरा निघाला तर, मी या प्रकरणी जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहे. माझी विनंती आहे की, कोणत्याही पुराव्याशिवाय माझी बदनामी करू नका. माझा या प्रकरणाशी दूर दूर संबंध नाही, असं तो पुढे म्हणाला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com