Cyber Crime News : निवडणुकीच्या काळात सायब चोरट्यांचा सुळसुळाट; युट्यूबवर व्हिडिओ पाहून बनवले बनावट मतदार कार्ड

Crime News : मध्य प्रदेश सायबर पोलिसांनी बिहार येथून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. देशभरात बनावट मतदार कार्ड आणि आधार कार्ड दिले जात असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती.
Cyber Crime News
Cyber Crime NewsSaam TV

लोकसभा निवडणुकीच्या पार्शभूमिवर एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. बनावट मतदार कार्ड आणि ओळखपत्र बनवून ते व्यक्तींना अवघ्या २० रुपयांना विकले जात आहेत. असे एकूण २८ हजार बनावट कार्ड समोर आलेत. पोलिसांनी हे खोटे ओळखपत्र बनवून देणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मध्य प्रदेश सायबर पोलिसांनी बिहार येथून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. देशभरात बनावट मतदार कार्ड आणि आधार कार्ड दिले जात असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना देखील याबाबत माहिती मिळाली होती. आयोगाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची एमपी सायबर सेलकडे तक्रार केली. त्यावर सायबर सेलने ही कारवाई केली आहे. सदर आरोपी फक्त १० वी पास असून त्याने व्हिडिओच्या माध्यमातून अशा पद्धतीने डोकं चालवलं आहे. अवघ्या २० रुपयांना तो हे मतदार कार्ड विकत होता.

यूट्यूबर पाहून बनवली बनावट वेबसाईट

पोलीस तपासात पुढे अशी माहिती समोर आली की, आरोपीने बनावट वेबसाईट तयार करण्यासाठी यूट्यूबची मदत घेतली होती. यावर व्हिडिओ पाहून वेबसाईट बनवल्यावर त्यावर कोणताही फोटो आणि कोणत्याही व्यक्तीचे नाव टाकून मतदार कार्ड बनवले जात होते. सदर प्रकारणात देशाबाहेरील व्यक्तींचा देखील सहभाग असू शकतो,अशी शक्यता आहे.

घटनाक्रम

आरोपीने सुरूवातीला YouTube वरून संपूर्ण वेबसाइट तयार करण्याचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्याने ऑनलाइनद्वारे सोर्स कोड विकत घेतला. उत्तर प्रदेशमध्ये त्याने बनावट सिमकार्ड खरेदी केलं. त्यावर एसबीआयमध्ये बनावट खाते खोलून पेटीएम अकाउंट ओपन केलं. पुढे परदेशातील एका कंपनीकडून डोमेन देखील विकत घेतले. त्यानंतर टेलिग्रामवर अपलोड करत बनावट मतदार कार्ड बनवले.

Cyber Crime News
Pune Crime News: पुण्यात गोळीबाराच्या घटना सुरुच; माचिस मागण्यावरून एकावर गोळीबार, नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com