Pune Crime News: पुण्यात गोळीबाराच्या घटना सुरुच; माचिस मागण्यावरून एकावर गोळीबार, नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण

Three Firing Incidents Pune: पुण्यात गेल्या चोवीस तासात तीन गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
Pune Crime News
Pune Crime Saam Tv
Published On

सागर आव्हाड साम टीव्ही, पुणे

पुण्यात (Pune) गेल्या चोवीस तासात तीन गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. गुंडाच्या झाडाझडतीनंतर शहरात गोळीबार झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनांमुळे आता पुणे शहराच्या कायदा सुवव्यस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

सिंहगड पोलीस ठाणे हद्दीतील भूमकर चौकात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. गणेश गायडवाड ( रा. वारजे) याच्यावर गोळीबार झाला आहे. त्याच्या खांद्याला गोळी लागली (Pune Crime) आहे. आज पहाटे अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. माचीस मागीतल्याच्या कारणातून वाद झाला असल्याची माहिती मिळत आहे. पुण्यात आर्म ऍक्टचे गुन्हे दाखल असणार्‍या गुन्हेगारांची परेड मंगळवारी पुणे पोलिसांनी घेतली. अनेकांना पोलीस आयुक्तालयात बोलावलं होतं. त्यांना शहरात गोळीबाराच्या घटना झाल्या नाही पाहिजे, अशी सक्त ताकीद दिली जात असतानाच जंगली महाराज रस्त्यावर गोळीबार झाला. हे प्रकरण संपत नाही, तोपर्यंतच भल्या सकाळी दुसरी गोळीबाराची घटना घडली आहे.

जंगली महाराज रस्त्यावर मंगळवारी दुपारी पावने तीन वाजताच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एका बांधकाम व्यवसायिकावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने गोळी न झाडली गेल्यामुळे व्यवसायिकाचे (Crime News) प्राण वाचले. तर, दुसर्‍या घटनेत हडपसर शेवाळेवाडी येथे व्यवसायिक स्पर्धेतून एका माजी सैनिकाने दुसर्‍या माजी सैनिकावर गोळीबार केला. त्यामध्ये एकजण जखमी झाला आहे. शहरातील रेकॉर्डवर असलेल्या बंदूकबाजांची पोलीस आयुक्तालयात बोलवून परेड घेतली. त्यांना दम भरुन तंबी दिली. त्यानंतर गोळीबाराच्या या दोन घटना घडल्या आहेत.

पहिली घटना

जंगली महाराज रस्त्यावरील अरगडे हाईट्स येथे घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धीरज दिनेशचंद्र अरगडे (वय 38, रा. खडकी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध आर्म अ‍ॅक्टनुसार खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार अरगडे हे बांधकाम व्यवसायिका आहेत. त्यांचे शिवाजीनगर जंगली महाराज रस्त्यावर ऑफिस आहे. मंगळवारी दुपारी पावने एक वाजताच्या सुमारास अरगडे ऑफिसमध्ये (Pune Crime News)आले. काम संपवून ते पावने तीन वाजताच्या सुमारास घरी जाण्यासाठी बाहेर पडले. त्यांनी आपली कार खाली पार्क केली होती. उन्हामुळे ती गरम झाल्याने ते काचा खाली करून कारमध्ये बसले होते. अरगडे घरी निघण्याच्या तयारीत असताना, अचानक तुचाकीवरून दोघेजण आले. त्यांनी दुचाकी अरगडे यांच्या गाडीला चिटकवून उभी केली. दुचाकीवर (Three Firing Incidents Pune) पाठमागे बसलेल्या एकाने पिस्तूल काढून कॉक करत गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र गोळी झाडली गेली नाही. परत त्याने दुसर्‍यांदा पिस्तूल कॉक करून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी देखील गोळी झाडली गेली नाही. अरगडे यांनी आरडा-ओरडा केला. त्यामुळे दोघांनी गाडीवरून पळ काढला.

Pune Crime News
Salman Khan House Firing: आरोपींना पकडण्यासाठी पोलीस बनले भाविक; हल्लेखोर मंदिरात झोपले होते बेसावध, घटनास्थळी नेमकं काय घडलं?

घटना दुसरी

जंगली महाराज रस्त्यावरील गोळी झाडण्याच्या प्रयत्नाचा पोलीस मंगळवारी तपास करत असताना बुधवारी (दि.17) सकाळी पावने दहा वाजताच्या सुमारास हडपसरमधील शेवाळवाडीत भररस्त्यात गोळीबाराची घटना घडली. सुरक्षा रक्षक एजन्सीजच्या व्यवसायिक स्पर्धेतून एका माजी सैनिकाने दुसर्‍या माजी सैनिकावर पिस्तूलातून गोळ्या (Firing Incidents) झाडल्या. जयवंत बापुराव खलाटे (वय.53,रा. भेकराईनगर) असे गोळीबारात जखमी झालेल्या माजी सैनिकाचे नाव आहे. त्यांच्यावर दोन गोळ्या झाडण्यात आल्या असून, एक गोळी पायाला लागली आहे. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर याप्रकरणी सुधीर रामचंद्र शेडगे (वय.53,रा. गोंधळेगनर) या दुसर्‍या माजी सैनिकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने आपल्या परवानाधारक पिस्तूलातून हा गोळीबार केल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटना तिसरी

पुण्यात दोन दिवसात गोळीबाराच्या तीन घटना घडल्या आहेत. एका बांधकाम व्यवसायिकावर दुचाकीवर आलेल्या दोघांनी गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र पिस्तूल कॉक केल्यानंतर गोळी झाडली गेली (Firing Incidents Pune) नाही. तर शेवाळवाडी हडपसर येथे व्यवसायिक स्पर्धेतून एका माजी सैनिकाने दुसऱ्या माजी सैनिकावर गोळ्या झाडल्या. या दोन घटनांनंतर लगेच सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत भुमकर चौक परिसरात आज पहाटे अडीच वाजताच्या सुमारास एक व्यक्तीवर गोळ्या झाडण्यात आल्या. गणेश गायकवड (रा. वारजे) असे त्याचे नाव आहे. माचीस मागीतल्याच्या कारणातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Pune Crime News
Jamner Fire News : गॅस गळतीने सहा घरांना आग; संसार आले उघड्यावर, जळगाव जिल्ह्यातील आगीची दुसरी घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com