Julun Yeti Reshimgathi: 'जुळून येती रेशीमगाठी' फेम 'आदित्य' अडकला लग्नबंधनात; कलाकारांनी लावली लग्नाला हजेरी

Julun Yeti Reshimgathi Fame Actor Married: मराठी मालिकाविश्वातील सर्वात प्रसिद्ध मालिकांपैकी एक म्हणजे 'जुळून येती रेशीमगाठी'. जुळून येती रेशीमगाठी मालिका प्रेक्षक आजही पाहतात.मालिकेतील कलाकार काही न काही कारणांनी चर्चेत असतात. नुकतंच मालिकेतील एका कलाकाराने लग्नगाठ बांधली आहे.
Kaustubh Diwan
Kaustubh DiwanSaam Tv

मराठी मालिकाविश्वातील सर्वात प्रसिद्ध मालिकांपैकी एक म्हणजे 'जुळून येती रेशीमगाठी'(Julun Yeti Reshimgathi). जुळून येती रेशीमगाठी मालिका प्रेक्षक आजही पाहतात. मालिकेतील मेघना- आदित्य ही जोडी चाहत्यांना खूपच आवडली होती. मालिकेतील इतर कलाकारांनीही चाहत्यांना वेड लावले होते. मालिकेतील कलाकार आजही अनेक कारणांनी चर्चेत असतात. दरम्यान, मालिकेतील एक कलाकार लग्नबंधनात अडकला आहे.

जुळून येती रेशीमगाठी मालिकेतील 'आदित्य नगरकर' लग्नबंधनात अडकला आहे. आदित्य नगरकर म्हणजे अभिनेता 'कौस्तुभ दिवाण'ने (Kaustubh Diwan)लग्न केले आहे. कौत्सुभने किर्ती कदम हिच्याशी लग्नगाठ बांधली आहे. कौस्तुभच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

कौस्तुभ आणि किर्तीच्या लग्नाला मराठी कलाकारांनीही हजेरी लावली होती. कौस्तुभच्या लग्नाला अभिनेता आस्ताद काळे, स्वप्नाली पाटील, मेधा धाडे, शिल्पा नवलकर, अभिजीत केळकर या कलाकारांनी हजेरी लावली होती. कौस्तुभच्या लग्नाचे आणि रिसेप्शनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. कौस्तुभ आणि किर्तीने लग्नविधीसाठी अगदी पारंपारिक लूक केला होता.किर्तीने नऊवारी साडी नेसली होती. तर कौस्तुभने ऑफ व्हाइट कलरचा कुर्ता आणि धोतर परिधान केले होते. रिसेप्शनला नवरीने घागरा तर कौस्तुभने ब्लॅक ब्राउन कलरची शेरवानी असा लूक केला होता. दोघेही या लूकमध्ये खूप सुंदर दिसत होते.

Kaustubh Diwan
Prathana Behere: '...म्हणून आम्ही अलिबागला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला'; प्रार्थना बेहरेने सांगितलं मुंबईपासून दूर राहण्याचे कारण

कौस्तुभच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये झळकला आहे. त्याने जुळून येती रेशीमगाठी, बंध रेशमाचे, तुझं माझ सपान या मालिकांमध्ये काम केले आहे.

Kaustubh Diwan
Malaika Arora: कुठे गेली आई-मुलाच्या नात्याची प्रतिष्ठा?, अरहानला व्हर्जिनिटीबद्दल प्रश्न विचारल्याने मलायका अरोरा झाली ट्रोल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com