Salman Khan  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Salman Khan : सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा बनला हिरो, VIDEO तुफान व्हायरल

Salman Khan Bodyguard Shera Debut : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा बॉडीगार्ड शेराने छोट्या पडद्यावर एन्ट्री केली आहे. त्याने एका जाहिरातीत काम केले आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Shreya Maskar

सलमान खान सध्या त्याचा आगामी चित्रपट 'बॅटल ऑफ गलवान' मुळे चर्चेत आहे.

सलमान खानचा बॉडीगार्ड शेराने छोट्या पडद्यावर एन्ट्री केली आहे.

शेराने एका जाहिरातीत काम केले आहे.

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) सध्या त्याचा आगामी चित्रपट 'बॅटल ऑफ गलवान' (Battle Of Galwan) मुळे चर्चेत आहे. तसेच सलमान खानचा लोकप्रिय शो 'बिग बॉस 19' (Bigg Boss 19) सुद्धा लवकरच सुरू होणार आहे. सलमान चाहत्यांचे मनोरंजन करत असताना आता सलमान खानचा बॉडीगार्ड शेराने देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. याचा खास व्हिडीओ सोशल मिडिया तुफान व्हायरल होत आहे. शेरा (Shera Gurmeet Singh Jolly) हा सलमान खानचा विश्वासू बॉडीगार्ड आहे. नेहमी पडद्यामागे दिसणारा शेरा आज पडद्यावर दिसत आहे.

शेराने रक्षाबंधनच्या एका जाहिरातीत काम केले आहे. त्याचा जाहिरातीत एक खास अंदाज पाहायला मिळत आहे. डिलिव्हरी अ‍ॅपच्या रक्षाबंधन जाहिरातीत शेरा झळकला आहे. त्याचा हो व्हिडीओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत असून यावर चाहत्यांकडून कमेंट्सचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. जाहिरातीत शेरा अडचणीत असलेल्या महिलांना मदत करताना दिसत आहे. तो त्यांच्यासाठी भाऊ आहे. जाहिरातीत शेराने गरजू महिलांसाठी 'भावाची' भूमिका साकारली आहे.

शेरा कोण?

शेराच्या लूकचे आणि त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सलमान खानचा बॉडीगार्ड शेराचे संपूर्ण नाव गुरमीत सिंह जॉली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शेरा 1995 पासून सलमान खानचा प्रायव्हेट बॉडीगार्ड म्हणून काम करत आहे. तो सिक्युरिटी हेड आहे. तसेच तो टायगर सिक्युरिटी नावाची एक सुरक्षा फर्म देखील चालवतो. शेरा सुरुवातीच्या काळात बॉडी बिल्डर होता. मीडिया रिपोर्टनुसार, शेराने 1987 मध्ये मुंबई ज्युनियरचा किताब जिंकला. 1988 मध्ये मिस्टर महाराष्ट्र ज्युनियरमध्ये उपविजेता झाला.

बॅटल ऑफ गलवान

'बॅटल ऑफ गलवान' चित्रपटात भारतातील एका युद्धाची कहाणी दाखवण्यात येणार आहे. लडाखच्या गलवान व्हॅली घडलेला हा संघर्ष पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 'बॅटल ऑफ गलवान' ही कहाणी जून 2020 रोजी गलवान खोऱ्यात भारतीय आणि चीनी सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षाची आहे. हे युद्ध पारंपरिक शस्त्रांऐवजी दगड, लाकडी काठ्या यांनी लढले गेले. कारण त्या भागात बंदुका वापरण्यावर बंदी होती. या संघर्षात दोन्ही देशांच्या जवानांना आपले प्राण गमवावे लागले.

सलमान खानच्या बॉडीगार्डचे नाव काय?

शेरा (गुरमीत सिंह जॉली)

शेराने कोणत्या जाहिरातीत काम केले?

रक्षाबंधन जाहिरात

सलमान खानचा आगामी चित्रपट कोणता?

बॅटल ऑफ गलवान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : ब्रूक-रूटची शतकीय खेळी, नंतर भारतीय गोलंदाजांचं कमबॅक; ओव्हल कसोटीचा निकाल शेवटच्या दिवशी लागणार

Amit Thackeray: मुलींवर हात उचलणाऱ्यांचे हातपाय तोडा, मग पोलिसांना द्या: अमित ठाकरे

JK Encounter: पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ६ चकमकी, २१ दहशतवाद्यांना कंठस्नान

Prajwal Revanna: प्रज्वल रेवण्णाला जन्मठेप; पीडितेच्या साडीवरील स्पर्म मुख्य पुरावा|VIDEO

Borivali News: तलावात आंघोळीसाठी गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू, माजी खासदाराचे पालिका प्रशासनावर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT