Richa Chadha And Ali Fazal Announce The Arrival Of Their Baby Girl Instagram
मनोरंजन बातम्या

Richa Chadha-Ali Fazal : रिचा चड्ढा आणि अली फजल झाले आई-बाबा, अभिनेत्रीने दिला गोंडस बाळाला जन्म

Richa Chadha And Ali Fazal Announce The Arrival Of Their Baby Girl : बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अभिनेता अली फझल आई बाबा झाले आहेत. इन्स्टा स्टोरी शेअर करत कपलने चाहत्यांना ही 'गुड न्यूज' दिलेली आहे.

Chetan Bodke

बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अभिनेता अली फझल आई बाबा झाले आहेत. त्यांना कन्यारत्न झाला आहे. अभिनेत्रीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. रिचा आणि अलीने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत चाहत्यांना ही 'गुड न्यूज' दिलेली आहे.

रिचाने १६ जुलै रोजी गोंडस मुलीला जन्म दिलेला आहे. स्टोरी शेअर करत त्यांनी आपला आनंद चाहत्यांसोबत शेअर केलेला आहे. आता चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. रिचा आणि अली यांनी फेब्रुवारी महिन्यात आपण आई- बाबा होणार असल्याचं सांगितलं होतं आता त्यांनी एका गोंडस बाळाचं स्वागत केलं आहे.

अली फझल आणि रिचा चड्ढा यांच्या घरी गोंडस पाहुणीचं आगमन झालं आहे. इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करताना त्यांनी कॅप्शन दिले की, "तुम्हाला सांगताना खूप आनंद होतोय, आमच्या घरी १६ जुलै २०२४ रोजी एका गोंडस मुलीचं आगमन झालं आहे. बाळाची तब्येत उत्तम आहे. आमचे कुटुंब आनंदीत आहे. आम्ही आमच्या हितचिंतकांचे आणि चाहत्यांचे त्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादासाठी आभार मानतो. खूप खूप प्रेम." अशी स्टोरी अभिनेत्रीने शेअर केलेली आहे.

नुकतंच रिचाने इन्स्टाग्रामवर बेबी बंप फ्लाँट करत एक खास फोटोशूट पोस्ट केलं होतं. फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलेलं की, "प्रकाशाच्या किरणाशिवाय इतकं निर्मळ प्रेम या जगामध्ये काय काय आणू शकतो ? माझ्या आयुष्यातील अविश्वसनीय प्रवासात माझा साथीदार बनल्याबद्दल अली फजलचे धन्यवाद." अशी पोस्ट अभिनेत्रीने शेअर केली होती. रिचा आणि अलीने लग्नाच्या अनेक वर्षे आधी एकमेकांना डेट करत होते. डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

'फुकरे' चित्रपटाच्या सेटवर २०१२ मध्ये दोघांचीही भेट झाली होती. तेव्हा त्यांची फ्रेंडशिप झाली होती. पण त्या फ्रेंडशिपचे रुपांतर नंतर रिलेशनशिपमध्ये झाले. दरम्यान, अली फजलच्या कामाबद्दल बोलायचे तर, गेल्या काही दिवसांपासून अली फजल 'मिर्झापूर ३'मुळे चर्चेत आहे. तर रिचा चड्ढा संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'हीरामंडी' सीरीजमुळे चर्चेत आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Running Benefits: सकाळी धावण्याचे शरीरावर काय परिणाम होतो?

Psychological Fact : नजर लागण्यामागे दडलं आहे एक सायकॉलॉजिकल सत्य, आत्ताच जाणून घ्या

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Jio Recharge Plan: फक्त ८९५ रुपयांत मिळणार ३३६ दिवसांची सेवा, जिओने दिला ग्राहकांसाठी मोठा लाभ

Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ

SCROLL FOR NEXT